Pune - Goa Flight Dainik Gomantak
गोवा

Pune - Goa Flight: गोवा ख्रिसमसचा प्लॅन फिसकटला; पुण्यातून जाणाऱ्या फ्लाईटला नऊ तासांचा विलंब

Pune to Goa Flight Delay: फ्लाईटला नऊ तास उशीर झाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

Pramod Yadav

Pune - Goa Flight Delay

पुणे: पुण्यातून गोव्याला जाणाऱ्या फ्लाईटने तब्बल नऊ तास विलंबाने उड्डाण केल्याने १०० पर्यटक आणि प्रवशांचा खोळंबा झाला. फ्लाईटने अनेकजण नाताळसाठी गोव्यात जात होते. दरम्यान, दुपारी जाणाऱ्या फ्लाईटने रात्री उशीरा उड्डाण केल्याने पर्यटकांचा गोव्यातील नाताळ प्लॅन फिसकटला.

स्पाईसजेट कंपनीची SG-185 फ्लाईट बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता पुण्यातून गोव्यासाठी उड्डाण घेणार होती. जवळपास एक तास अगोदरच प्रवासी विमानतळावर दाखल झाले.

पण, प्रवाशांना फ्लाईट सुरुवातीला साडे बारा वाजता, नंतर दीड वाजता आणि त्यानंतर रात्री साडे सात वाजता उड्डाण करेल, अशी माहिती देण्यात आली. अखेर या फ्लाईटने रात्री सव्वा नऊ वाजता गोव्यासाठी उड्डाण केले. फ्लाईटला नऊ तास उशीर झाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

विमान उड्डाणाला नऊ तासांचा विलंब झाल्याने नाताळच्या निमित्ताने गोव्यात जाणाऱ्या प्रवाशांच्या पदरी निराशा आली. विमान कंपनीकडून प्रवाशांना योग्य वेळी माहिती दिली नाही तसेच, पर्यायी प्रवासाची व्यवस्था केली नाही म्हणून त्यांनी विमानतळावर गोंधळ घातला.

सुरुवातीला विमानातील स्टाफ उपलब्ध नसल्याने विलंब होत असल्याचे कारण देण्यात आले. त्यानंतर तांत्रिक अडचणीचे कारण देऊन विलंब करण्यात आला. अखेर नऊ तासांनी विमानाने उड्डाण घेतले. तोपर्यंत प्रवाशांना विमानतळावर ताटकळत थांबावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT