Karwar Vinayak Naik Murder Case Dainik Gomantak
गोवा

Vinayak Naik Murder Case: पुण्यातील उद्योजकाच्या हत्येचे गोवा कनेक्शन, मित्रानं काढला काटा; प्राथमिक तपासात कारण समोर

Pune Businessman Vinayak Naik Death Case: पुणे येथील प्रसिद्ध उद्योगपती विनायक काशिनाथ नाईक (५२) यांचा कारवार तालुक्यातील हणकोण येथे रविवारी पहाटे खून झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

Pune Businessman Vinayak Naik Karwar Murder Case
खानापूर : पुणे येथील प्रसिद्ध उद्योगपती विनायक काशिनाथ नाईक (५२) यांचा कारवार तालुक्यातील हणकोण येथे रविवारी पहाटे खून झाला. त्‍या प्रकरणी मूळचे हणकोण येथील रहिवासी तथा उद्योगधंद्यानिमित्त फोंडा-गोवा येथे वास्‍तव्‍यास असणाऱ्या संशयित गुरुप्रसाद राणे यांचा कर्नाटक पोलिसांनी शोध सुरू केला आहे. प्रेमाच्‍या चौकोनातून ‘सुपारी’ देऊन राणे यांनी खून केल्‍याचा प्राथमिक अंदाज सदाशिवगड पोलिसांनी व्‍यक्‍त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, मृत विनायक काशिनाथ नाईक हे मूळ हणकोण येथील रहिवासी. त्‍यांचा गुरुप्रसाद राणे या व्‍यावसायिकाने आपल्‍या नेपाळी कामगारांना सुपारी देऊन खून केला. विशेष म्‍हणजे, मृत विनायक व गुरुप्रसाद हे दोघेही आजूबाजूच्‍या गावांत जन्मले, दोघांची पूर्वीपासून एकमेकांशी ओळख होती. दोघेही उद्योजक बनून लखपती बनले; परंतु अनैतिक संबंध खुनास कारण ठरले. संशयित राणे याचा शोध घेण्‍यासाठी कर्नाटक पोलिस मंगळवारी फोंड्यात दाखल झाले होते.

असा झाला उलगडा

* खुनाचा प्रकार जेथे घडला, तेथेच नजीक असलेल्‍या बँकेच्‍या ‘सीसीटीव्‍ही’मध्‍ये तो कैद झाला. हल्‍लेखोर कारमधून पळाले होते. कर्नाटक पोलिसांनी तपास केला असता, सदर कार लोलये-काणकोण येथील असल्‍याचे आढळून आले. कार मालकाकडे चौकशी केली असता, गुरुप्रसाद राणे याने कार भाडेतत्त्वावर नेली होती, अशी माहिती समोर आली.

* पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून हल्‍लेखोर कामगारांना मंगळवारी म्‍हापसा येथे अटक केली. संशयित दोघे कामगार नेपाळी आहेत. ते गुरुप्रसादकडे कामाला होते. त्‍यांनी सुपारी घेऊन खून केल्‍याचे तपासात समोर आले. पोलिस सध्‍या गुरुप्रसाद याचा शोध घेत आहेत. तो फरार आहे. कारवारचे पोलिस अधीक्षक के. नारायण अधिक तपास करत आहेत.

कोण आहेत विनायक नाईक?

विनायक नाईक यांचा पुण्यातील वाकड येथे इलेक्ट्रीकल वस्तूंचा व्यवसाय असून ते मूळचे हणकोण- कारवार येथील आहेत. हणकोण येथील श्री सातेरी देवीच्या जत्रोत्सवात सहभागी होण्यासाठी ते कुटुंबीयांसमवेत मूळ गावी आले होते. १० ते १६ सप्टेंबर या कालावधीत ही जत्रा होती.

मात्र, जत्रोत्सव संपल्यानंतर २१ सप्टेंबर रोजी आईच्या श्राद्धासाठी त्यांनी मुक्काम वाढविला होता.  रविवारी म्हणजेच २२ सप्टेंबर रोजी सकाळी ते परत पुण्याला जाणार होते,  त्यासाठी पहाटे आवरा आवर करताना पाच अनोळखींनी त्यांच्या घरात घुसून तलवारीने त्यांच्यावर वार केले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.

...म्‍हणून घेतला बदला

  • संशयित गुरुप्रसाद राणे याची पत्‍नी केंद्रीय कर्मचारी असून, ती पुणे येथे कार्यरत आहे. तिचे व मृत विनायक यांचे अनैतिक संबंध असल्‍याचा विनायकच्‍या पत्‍नीला संशय आला होता. तिने गुरुप्रसाद राणे याला तशी माहिती दिली होती. या प्रकारात गुरुप्रसाद आणि विनायक याची पत्‍नी यांच्‍यातही जवळीक निर्माण झाली.

  • विनायकचा काटा काढण्‍यासाठी गुरुप्रसाद याने विनायकच्‍या पत्‍नीकडून माहिती घेतली व देवाच्‍या उत्‍सवासाठी हणकोण येथे दाखल झालेल्‍या विनायक नाईक यांचा कामगारांकरवी सुपारी देऊन खून केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: नोव्हेनाच्या पहिल्याच दिवशी अलोट गर्दी! जुने गोवेत 1 लाख भाविक; अजून आकडा वाढणार

Ranbir Kapoor At IFFI: 'मला चित्रपट दिग्दर्शक व्हायचंय पण..'; रणबीरने व्यक्त केली महत्वाकांक्षा; प्रेक्षकांना दिली खूशखबर

Goa Fianance Scam: गोव्यात आजवरचा सर्वात मोठा आर्थिक घोटाळा; गुंतवणुकीच्या नावाखाली 50 जणांना 130 कोटींचा गंडा

Mayem Fire Incident: वायंगिणी-मयेत आगीचा तांडव! 30 लाख रुपयांचे नुकसान; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

Cash For Job: आमच्यावर पोलिसांमार्फत पाळत! सरदेसाई, पालेकरांचा सनसनाटी आरोप

SCROLL FOR NEXT