Goa Night Club Dainik Gomantak
गोवा

Goa Night Club...तर पुण्यातील त्या दोघांचा अपघात टळला असता!

त्या दोघांच्या हातामध्ये एका नाईट क्लबचे बँड होते, किनाऱ्यावरील नाईट क्लबकडे गोवा पोलिसांचे दुर्लक्ष

दैनिक गोमन्तक

पणजी: हडफडे येथील खाडीमध्ये कार पडून झालेल्या अपघातात (Accident) पुण्याच्या (Pune) दोघांचा दुर्दैवीपणे मृत्यू झाला मात्र त्या दोघांच्या हातामध्ये एका नाईट क्लबचे (Night Club) बँड होते. सरकारने कोविड - 19 च्या (Covid-19) पार्श्‍वभूमीवर नाईट क्लबवरील बंदी अजून उठविली नसताना हा नाईट क्लब (Goa Night Club) सुरू होता हे उघड झाले आहे. या दोघा तरुणांनी नाईट क्लबमध्ये काही वेळ घालविल्यानंतर कारने परतताना हा अपघात झाल्याने त्याला जबाबदार कोण असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

हणजूण पोलिस निरीक्षक सूरज गावस यांनी दिलेल्या माहितीनुसार हा नाईट क्लब कळंगुट पोलिस स्थानकाच्या अधिकार कक्षेत येतो व कारमध्ये बुडून मृतावस्थेतील शुभम नितीन देडगे व अभिनेत्री ईश्‍वरी देशपांडे या दोघांच्या हातामध्ये त्या नाईट क्लबचे बँड होते. नाईट क्लब सुरू करण्यास सरकारने अजूनही परवानगी दिलेली नाही. असे असतानाही पोलिसांच्या नाकावर टिच्चून किनारपट्टी परिसरात अनेक नाईट क्लब बिनदिक्कतपणे रात्री उशिरापर्यंत सुरू असतात.

रात्रीच्यावेळी पोलिस वाहनातून गस्त घालतात मात्र तो फक्त दिखाऊपणा असतो. त्यामुळे या नाईट क्लबसंदर्भातही या घटनेप्रकरणी पोलिसांनी चौकशी करण्याची गरज आहे. नाईट क्लब रात्री उशिरापर्यंत सुरू नसता तर ही दोघे तेथे गेलीच नसती व हा अपघात टळला असता, असे मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केले. किनारपट्टी भागात अनेक बेकायदेशीर घटना व प्रकार सुरू असतानाही या परिसरातील पोलिस स्थानकातील गस्तीवर असलेल्या पोलिस पथकांकडून जाणूनबुजून कानाडोळा केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT