Male Bhajan Competition Vasco Dainik Gomantak
गोवा

पं. मनोहरबुवा शिरगावकर स्मृती विभागीय पुरुष भजन स्पर्धा संपन्न, कला अकादमी गोवा तर्फे आयोजन

नवेवाडे येथे श्री महारुद्र हनुमान संस्थान, सभागृहात उत्साहात संपन्न

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco News : कला अकादमी गोवा आयोजित पं. मनोहरबुवा शिरगावकर स्मृती विभागीय स्तरावरील पुरुष कलाकार भजन स्पर्धा रविवारी 30 जुलैला नवेवाडे येथे श्री महारुद्र हनुमान संस्थान, सभागृहात उत्साहात संपन्न झाली.

केंद्र क्र. 2 वरील सदर स्पर्धा दोन सत्रात घेण्यात आली. पहिल्या सत्रात श्री रामनाथ दामोदर भजनी पथक (चिखली वास्को), आघाझ द रायसिंग ऑफ वास्को (वास्को), ब्राह्मणेश्वर भजनी मंडळ. (सडा- वास्को), मोरुडकर भ. पथक (सडा- वास्को), श्री रामनाथ दामोदर भजनी मंडळ. ( वास्को), ॐ श्री विष्णू कला सांस्कृतिक संस्था (नवेवाडे- वास्को), शारदा संगीत विद्यालय (हेडलॅण्ड, सडा- वास्को) आदी भजनी पथकांनी सादरीकरण केले.

दुपारच्या दुसऱ्या सत्रात स्वर संगीत सांस्कृतिक संस्था (एल्मान्त- वास्को), श्री ईश्वटी ब्राह्मण लक्ष्मी नारायण भजनी मंडळ. (हेडलॅण्ड सडा-मुरगाव), श्री शांतादुर्गा लक्ष्मी नृसिंह साखळ्यो भजनी मंडळ (सांकवाळ), भक्ती पुरुष भजनी मंडळ. (काणकोण ), श्री मल्लीकार्जुन कला क्रीडा भजनी मंडळ (श्रीस्थळ-काणकोण)

श्री साते भजनी मंडळ (शेळवण-कुडचडे), श्री पुरुष म्हारु सातेरी पुरुष भजनी मंडळ (बागवाडा -कुडचडे), श्री लक्ष्मी साखळ्यो भजनी मंडळ (रासई - सासष्टी), शिवदामोदर भजनी मंडळ, (फातोर्डा-मडगाव), स्वर साधना कला व सांस्कृतिक संस्था (करंजाळ, मडकई-फोंडा) पथकांचे सादरीकरण झाले.

सुरुवातीला कला अकादमी गोवाचे कार्यक्रम विकास अधिकारी संजीव झर्मेकर यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. तसेच स्पर्धेचा मुख्य हेतू स्पष्ट केला. नंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून भजन स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.

यावेळी संस्थानचे अध्यक्ष सुरेंद्र केरकर, सचिव दर्शन आसोलकर, खजिनदार प्रसाद परब,नगरसेवक यतिन कामूर्लेकर,प्रदिप नाईक,बाबूश बांदोडकर,रमाकांत शिरोडकर तसेच परीक्षक दुर्गाकुमार नावती, विठ्ठल गावस, प्रसाद कळंगुटकर व कला अकादमी गोवाचे कार्यक्रम विकास अधिकारी संजीव झमेंकर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT