pedne people appeal  Dainik Gomantak
गोवा

Goa News : हरकतींसाठी जमीन आराखडा उपलब्ध करा ; पेडणेवासीयांचे आमदारांना निवेदन

सरकारचा घटक असलो तरी ज्या जनतेने निवडून दिले त्यांचे हित जपणे, आपले प्रमुख कर्तव्य आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News : मोरजी, पेडणे तालुक्याचा जमीन आराखडा नागरिक किंवा स्थानिक आमदारांना विश्वासात न घेता सरकारने लादला आहे. पेडणे तालुक्याच्या जमीन आराखड्यात झोन बदल केलेला आहे.

तो अमान्य असून ५ ऑक्टोबरपूर्वी पेडणे नगर नियोजन कार्यालयात हा आराखडा उपलब्ध करावा. तिथे आम्ही हरकती, दावे सादर करू, अन्यथा ६ ऑक्टोबर रोजी चोपडे शिवोली पुलावर रास्ता रोको करू,

असा इशारा पेडणेवासीयांनी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांना निवेदन दिल्यानंतर दिला.

आरोलकर यांची मांद्रे कार्यालयात राजन कोरगावकर,सदानंद वायंगणकर ,फ्रान्सिस फर्नांडिस, साईनाथ आपुले, स्वप्निल शेर्लेकर तुषार शेट गावकर ,हरी म्हामल, जगन्नाथ पार्सेकर, संदेश सावंत,शिवकुमार आरोलकर, अँथनी फर्नांडिस, हेमंत चोपडेकर. दयानंद मांजरेकर यांनी भेट घेतली.

जमीन आराखडा तयार करताना सरकारने आपल्यालाही विश्वासात घेतलेले नाही. जनतेला आराखडा नको, तर तो रद्द करण्यासाठी आपणही प्रयत्नशील राहू.

सरकारचा घटक असलो तरी ज्या जनतेने निवडून दिले त्यांचे हित जपणे, आपले प्रमुख कर्तव्य आहे.

-जीत आरोलकर, आमदार, मांद्रे मतदारसंघ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT