Protest of BSNL workers  Dainik Gomantak
गोवा

बीएसएनएल कर्मचाऱ्यांची पणजीत जोरदार निदर्शने

देशव्यापी संपाला पाठिंबा देत वेतन सुधारणांची मागणी

दैनिक गोमन्तक

पणजी : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाविरुद्ध भारत संचार निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संपात सहभाग दर्शवून निदर्शने केली. कंपनीने कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा करण्याबरोबरच अत्याधुनिक उपकरणांचाही समावेश करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. या संपामध्ये गोव्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. (Protest of BSNL workers News Updates)

केंद्र सरकारच्या कामगार, शेतकरी व कष्टकारी वर्ग कर्मचाऱ्यांविरोधातील धोरणाचा कडाडून विरोध करण्यात आला. देशव्यापी संपात या कंपनीच्या विविध राज्यातील कर्मचारी सहभागी झाले होते. ‘बीएसएनएल’ (BSNL) कर्मचारी संघटनांच्या प्रमुख मागण्यांमध्ये केंद्र सरकारने उपकरणे खरेदी करताना बीएसएनएलमध्ये भेदभाव केला जाऊ नये. या कंपनीचे 4G त्वरित सुरू करावे तसेच वेळेवर 5G सुरू करण्यासंदर्भात तयारी सुरू करा. बीएसएनएलचे मोबाईल टॉवर्स व ऑप्टिक फायबरची विक्री करून कमाई केली जाऊ नये. वेतनाची (Salary) थकबाकी त्वरित देण्यात यावी, या मागण्यांचा समावेश होता.

गेले दोन दिवस सुरू असलेल्या संपात संपूर्ण राष्ट्रीय स्तरावरील ट्रेड युनियन, सरकारी व सार्वजनिक क्षेत्राखालील कर्मचारी, वीज कर्मचारी, राज्य सरकार कर्मचारी तसेच अनेक क्षेत्रातील कर्मचारी सहभागी झाले होते.या संपानंतर (Protest) केंद्र सरकार मागण्यांची घेईल, अशी अपेक्षा यावेळी बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT