Goa Mining 

 

Dainik Gomantak

गोवा

'केवळ आश्‍वासनं नकोत, निवडणुकीपूर्वी खाणी सुरु करा'

पणजीत ‘आयटक’च्या नेतृत्त्वात खाण अवलंबितांचं धरणे आंदोलन

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यात गेल्या काही वर्षांपासून बंद असलेल्या खाणी सरकारने लवकर सुरु करण्याच्या मागणीसाठी खाण अवलंबितांनी आंदोलन केलं. अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेसच्या गोवा विभागातर्फे पणजी बसस्थानक येथील क्रांती सर्कलजवळ धरणे आंदोलन केले. या आंदोलनावेळी सरकारने खाणी निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी सुरु कराव्यात, अन्यथा राज्यात मोठी मोहीम तसेच चळवळ उभारली जाईल असा इशारा ‘आयटक’तर्फे देण्यात आला.

गेल्या अनेक वर्षांपासून भाजप (BJP) सरकार लोकांना खाणी सुरु करण्याचे आश्‍वासन देत आलं आहे. मात्र, अजूनही ते पूर्ण केलेलं नाही. खाणी सुरु केल्या नाहीत तर खाण अवलंबित मतदार सरकारला योग्य धडा शिकवतील, असा इशारा ‘आयटक’चे सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी दिला.

खाण अवलंबितांचे संसार खाणबंदीमुळे उद्‍ध्वस्त झाले आहेत. अनेकजण कर्जाच्या बोजाखाली चिरडले आहेत. बेरोजगार झाल्याने अनेकांच्या कुटुंबावर मोठा परिणाम झाला आहे. पर्यायी रोजगार नसल्याने सरकार या खाणी (Goa Mining) सुरू करील व सर्व काही सुरळीत या आशेवर असलेले हे खाण अवलंबित जगत आहेत. मात्र आता त्यांचा अंत संपला आहे व सरकारला योग्य तो धडा शिकवण्यास तयार झाले आहेत. त्यापूर्वीच सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा. जर खाणी तूर्त सुरू करणे शक्य नसल्यास त्यांना प्रतिमाह किमान 20 हजार रुपयांचे मानधन खाणी सुरू होईपर्यंत दिले जावेत, अशी मागणी फोन्सेका यांनी केली.

‘आयटक’चे नेते ॲड. सुहास नाईक यांनी सरकारवर जोरदार टीका करताना ज्या प्रकारे खाण कर्मचारी तसेच अवलंबितांना वेठीस धरून सरकार अन्याय करत आहे, त्याचा परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला दिसून येईल. वेळोवेळी फक्त आश्‍वासने देण्याचे काम या सरकारने केले आहे. हे सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरले आहे. देशातील महागाईमुळे खाण अवलंबितांना त्यांच्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करताना कर्जे घ्यावी लागत आहेत.

काहींना घरातील मौल्यवान वस्तूही विकण्याची पाळी या सरकारने आणली. मात्र, त्याबाबत या सरकारला गंभीरता नाही. गोवा मुक्तिदिनाच्या ६० व्या वर्षी गोवा सरकार मोठ्या दिमाखाने कार्यक्रम करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा केला. मात्र, खाण अवलंबितांना आर्थिक साहाय्य करण्यासाठी सरकारकडे निधी नाही. निवडणुकीपूर्वी सरकारने तोडगा काढून निदान या अवलंबितांना आर्थिक साहाय्य द्यावे, नाहीतर राज्यात चळवळ उभारली जाईल, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crypto Fraud: गोवा पोलिसांची मोठी कारवाई! 7.36 कोटींच्या क्रिप्टो घोटाळ्याचा पर्दाफाश; दुबईतील मास्टरमाइंडसह 10 जणांवर गुन्हा दाखल

Meta layoffs 2026: मेटाकडून 8000 कर्मचाऱ्यांची तडकाफडकी हकालपट्टी, पहाटे 4 वाजता ईमेल पाठवून दिला नारळ; टेक जगतात खळबळ

Crime News: गुंगीचे औषध देऊन काढले अश्लील फोटो, ब्लॅकमेल करुन लुटले, लग्नानंतरही छळले; मामा अन् मावशीने केले भाचीचे शोषण

Indian Railway Recruitment 2026: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 1191 जागांसाठी भरती जाहीर; परीक्षा आणि मुलाखतीशिवाय होणार निवड

Shani Vakri 2026: शनिदेव चाल बदलून 4 राशींना करणार मालामाल! नोकरदारांना मिळणार पगारवाढीची मोठी गूड न्यूज

SCROLL FOR NEXT