Aquaculture Workshop Dainik Gomantak
गोवा

Aquaculture Workshop: आमच्या निर्णयांमुळेच मत्स्य संपदेचे रक्षण- ढवळीकर यांचा दावा

मडकईत उन्नत भारत अभियानांतर्गत कार्यशाळा उत्साहात

गोमन्तक डिजिटल टीम

Aquaculture Workshop: आपण मत्स्‍योद्योगमंत्री असताना अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. मुख्य म्हणजे मत्स्य प्रजनन काळात बंदी आणण्याचा निर्णयही तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या सहकार्याने घेतला.

त्यामुळेच आज मत्स्य संपदेचे रक्षण झाले, असा दावा मडकईचे आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केला. तसेच आजच्या युवा पिढीने पारंपारिक मत्स्य व्यवसाय जपावे, असे आवाहनही त्यांनी केले.

उन्नत भारत अभियानतर्फे मडकई पंचायतीच्या सहकार्याने पंचायत सभागृहात शनिवारी एक दिवसीय मत्स्यशेती पालनविषयी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

विशेषतः शिंपल्यातील माशांचे संवर्धन यावर या कार्यशाळेत माहिती देण्यात आली. कार्यशाळेचे उद्‍घाटन केल्यानंतर ढवळीकर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी मडकईचे सरपंच शैलेंद्र पणजीकर, उपसरपंच संध्या नाईक, उन्नत भारतच्या डॉ. ज्योती पवार, डॉ. सविता केरकर, डॉ. लता गावडे तसेच डॉ. हरी खानापुरे आदी उपस्थित होते.

यावेळी सरपंच शैलेंद्र पणजीकर यांनी पारंपरिक मत्स्यशेतीचे रक्षण करण्याची आज आवश्‍यकता असून मत्स्य व्यावसायिकांना सरकारने अधिकाधिक पाठींबा द्यावा, असे आवाहन आपल्या भाषणात केले. डॉ. लता गावडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

अनुभवसिद्ध शिक्षणाची आवश्‍यकता-

व्यवसायासाठी केवळ पुस्तकी ज्ञान उपयोगी नाही, त्यासाठी अनुभवसिद्ध शिक्षण घेण्याची आवश्‍यकता आहे. गोव्यात मत्स्य व्यवसायाच्या मोठ्या संधी आहेत. या संधींचा लाभ युवावर्गाने घ्यायला हवा.

मत्स्यशेती ही फायदेशीर असून त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल. म्हणून हा व्यवसाय वाढावा यासाठी उन्नत भारत अभियानांतर्गत घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाचे आपण स्वागत करीत असल्याचे सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

गोवा हा निसर्गसौंदर्याने नटलेला प्रदेश आहे. येथील पारंपरिक कृषी उत्पादन आणि मत्स्यशेतीमुळे रोजगाराचे प्रभावी माध्यम राज्यात उपलब्ध होऊ शकते. म्हणून मत्स्यपालनासारख्या कार्यशाळांचा उपयोग आजच्या युवा पिढीने करून रोजगाराला प्राधान्य द्यावे.

- सुदिन ढवळीकर, मंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT