Prostitution in Goa Dainik Gomantak
गोवा

Prostitution in Goa : ऐजीच्या जिवावर बायजी उदार! वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या चौघींची सुटका; दलाल फरार

क्राईम ब्रँचची वागातोर येथे कारवाई

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji : राज्यात मोठ्या प्रमाणात वेश्‍या व्यवसाय सुरू असूनही त्यातील दलालांना गजाआड करण्यात पोलिसांना अपयश येत आहे. गुन्हा अन्वेषण विभागाच्या गुन्हे शाखेने दोन दिवसांपूर्वी वागातोर येथे टाकलेल्या छाप्यात चार तरुणींना ताब्यात घेऊन त्यांची सुटका करण्यात आली आहे व मेरशी येथील महिला सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

या चारही तरुणींना दलाल जॉन याने गोव्यात काही महिन्यापूर्वी आणले होते व त्यांना वेश्‍या व्यवसाय करण्यास लावून त्यांच्या मिळकतीवर तो जगत होता. याप्रकरणी पोलिसांनी संशयित दलाल जॉन विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

कुतिन्हो वाडा - वागातोर येथील बीच रिसॉर्ट तसेच ओझरान येथील गेट ऑफ लियॉनी प्रवेशद्वाराजवळ काही वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या तरुणी रात्री उशिरापर्यंत गिऱ्हाईक शोधत असतात, अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी ४ जुलै रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास वागातोर व ओझरान येथे छापे टाकले. या छाप्यावेळी काही तरुणी हॉटेलच्या बाहेर संशयास्पद आढळून आल्या.

एनजीओ व महिला पोलिसांच्या मदतीने त्यांना ताब्यात घेऊन प्राथमिक चौकशी करण्यात आली. या तरुणी मुंबई, दिल्ली, मध्यप्रदेश तसेच उत्तरप्रदेशमधील आहेत. जॉन नामक तरुणाने त्यांना या वेश्‍या व्यवसायासाठी गोव्यात आणून एका ठिकाणी ठेवले होते.

राहत असलेली जागा माहीत नसल्याचे त्या तरूणींनी पोलिसांना सांगितले. त्यांच्याकडे असलेल्या बॅग्जची तपासणी महिला पोलिसांनी केली असता काही संशयास्पद पॅकेटस् आढळून आली.

कारवाईपूर्वीच दलाल जॉन निसटला !

दलाल जॉन गिऱ्हाईकांना या तरुणींना पुरवत होता. या तरुणींना ताब्यात घेण्यापूर्वीच त्यांना वागातोर येथे सोडून गेला होता. त्यामुळे तो पोलिसांच्या तावडीतून निसटला.

या तरुणींना वेश्‍या व्यवसायात गुंतवून त्यांच्या पैशांवर संशयित स्वतःचा उदारनिर्वाह करत होता, असे पीडित तरुणींनी एनजीओला दिलेल्या जबानीत सांगितले आहे. त्यांना संशयित जॉन याचे पूर्ण नाव माहीत नसल्याचे सांगून माहिती दडपण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

International Purple Fest 2025: गोव्यातील समुद्रकिनारे आणि सार्वजनिक इमारती दिव्यांग-सुलभ बनवणार; मुख्यमंत्री सावंत यांची ग्वाही

IND vs WI 2nd Test: शुभमन गिल दिल्लीत रचणार 'महाकीर्तिमान'? डॉन ब्रॅडमन नंतर अशी कामगिरी करणारा ठरणार पहिला कर्णधार

घरात भांडण करुन पळाले, कच्छच्या जंगलात गाववाल्यांनी पकडले, अल्पवयीन पाकिस्तानी जोडप्याने प्रेमासाठी पार केली देशाची सीमा

Fishing Boat Accident: काणकोणातील राजबाग किनाऱ्यावर पुन्हा बोट उलटली, स्थानिक मदतीसाठी धावले!

Viral Video: बिहारमधून दिसू लागला हिमालय आणि माऊंट एव्हरेस्ट; मनमोहक व्हिडिओ आला समोर Watch

SCROLL FOR NEXT