Vasco Fish Market dainikgomantak
गोवा

विक्रेत्यांच्या नकारामुळे वास्कोचा प्रस्तावित मासळी बाजार रखडला

गोवा राज्य नागरी विकास संस्थेने बांधलेल्या तात्पुरत्या शेडमध्ये जाण्यास मासळी विक्रेत्यांचा नकार

दैनिक गोमन्तक

वास्को : येथील प्रस्तावित मासळी मार्केटने सध्या वेगळे वळण घेतले आहे. गोवा राज्य नागरी विकास संस्थेने बांधलेल्या तात्पुरत्या शेडमध्ये जाण्यास मासळी विक्रेत्यांनी नकार दिल्यामुळे येथील प्रस्तावित मार्केटच्या बांधकामाला मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

येथील प्रस्तावित वास्को मासळी मार्केटसाठी (Vasco) 2013 आणि 2018 दरम्यान तीनदा निविदा काढण्यात आली होती, त्यावेळी बांधकामाचा (construction) अंदाजे खर्च 9.5 कोटी धरण्यात आला होता. त्यावेळी गोवा राज्य नागरी विकास संस्थेने (goa state urban development agency) तात्पुरत्या स्वरूपाचे शेड बांधून तेथे मासळी (Fish) विक्रेत्यांना जाण्यास सांगितले होते. दरम्यान मुरगांव नगरपरिषद अधिकारी आणि विक्रेते यांच्यात अनेक संयुक्त बैठका झाल्या होत्या. त्यावेळी मुरगांव नगरपरिषद (Mormugao Municipal Council) अधिकार्‍यांनी नवीन मार्केट तयार होताच मासळी विक्रेत्यांना तेथे हलवले जाईल असे आश्वासन ही दिली होते. मात्र आश्वासनानंतरही विक्रेत्यांनी आपली भूमिका बदललेली नाही.

यावेळी विक्रेत्यांनी स्थलांतर करण्यास नकार देत असल्याचे नेमके कारण सांगताना एका विक्रेत्यांने सांगतिले की, घाऊक व्यापारी आणि स्थलांतरित विक्रेते हे महानगरपालिका (Municipal Corporation) क्षेत्रातील विविध ठिकाणांहून बाजाराबाहेरच मासे विकत आहेत, ज्यामुळे त्यांच्या व्यवसायात अडथळा येतो. त्यामुळे अशा परप्रांतीय विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्या विक्रेत्याने केली आहे.

त्यावर मुरगांव नगरपरिषद (Mormugao Municipal Council) चेअरपर्सन दामोदर कळसकर म्हणाले की, ते कौन्सिलच्या पुढील बैठकीत हा मुद्दा उचलून धरतील आणि विक्रेत्यांना तात्पुरत्या शेडमध्ये स्थलांतरित होण्यासाठी पटवून देण्याचा मार्ग काढतील. मात्र जुणे मासळी मार्केट (Old Fish Market) शेड जीर्ण झाले असून शीतगृहाची सोय नाही, वॉश रूम व पिण्याच्या पाण्याची सोय नाही. अस्वच्छ असण्याबरोबरच येथे मासळी विक्रेत्यांना बसण्याची योग्य व्यवस्था नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT