Land Conversion  Canva
गोवा

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Goa Land Conversions: राज्यातील आणखीन १ लाख १८ हजार ७५६ चौरस मीटर जमीन रुपांतरीत करण्यासाठी नगरनियोजन खात्याकडे प्रस्ताव सादर झाले आहेत. याविषयी आक्षेप खात्याने मागवले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Increased Land Conversion In Goa

पणजी: राज्यातील आणखीन १ लाख १८ हजार ७५६ चौरस मीटर जमीन रुपांतरीत करण्यासाठी नगरनियोजन खात्याकडे प्रस्ताव सादर झाले आहेत. याविषयी आक्षेप खात्याने मागवले आहेत. तर २ लाख २७ हजार ४३ चौरस मीटर रुपांतरीत करण्यास नगरनियोजन मंडळाने परवानगी दिली आहे. हे सर्व क्षेत्र ३ लाख ४५ हजार ७९९ चौरस मीटर होते.

प्रादेशिक आराखडा व म्हापसा नियोजन क्षेत्रातील तसेच पर्रा, हडफडे, नागोवा बाह्य विकास आराखड्यात दुरुस्तीच्या नावाखाली हे भू रूपांतर प्रस्तावित आहे. यातील सर्वात मोठे क्षेत्र हरमल येथे २० हजार चौरस मीटरचे आहे. तेथे मेग्नीटूड होम्सने वस्तीसाठी जमीन रूपांतर करून मागितली आहे. प्रेस्टीज एकर्सने सांकवाळ येथील ८ हजार ८६४ चौरस मीटर भूखंडाचा वापर गोदामाऐवजी वस्तीसाठी करण्यासाठी परवानगी मागितली आहे. कुचेली येथे इस्टेट वन ओ लाईट इन्फ्राने ३ हजार ५० चौरस मीटरचा झुडूपाखालील भूखंड वस्तीसाठी वापराचा प्रस्ताव सादर केला आहे.

बाती येथे ८ हजार ३८४ चौरस मीटरचा भूखंड नैसर्गिक अच्छादन व ना विकास क्षेत्रात असूनही तो वस्तीसाठी वापरण्याची परवानगी मागितली आहे. हडफडे येथे १ हजार ९९९ चौरस मीटरचा भूखंड ऑगस्टीनो फेर्राव यांनी झुडूपाखालील ते वस्तीसाठी असा बदल करून मागितला आहे.

अनेक प्रस्ताव

गिर्दोली येथे अंशतः झुडूपाखाली असलेला १ हजार ८८० चौरस मीटरचा भूखंड एडल बिल्डर्सने वस्तीसाठी वापरण्यास परवानगी मागितली आहे.

सर्वण येथे अंशतः नैसर्गिक आच्छादन, सिंचन क्षेत्रातील ६८ हजार ३९९ चौरस मीटरच्या भूखंडाचा वापर बदल करण्यास शांबा धावसकर यांनी परवानगी मागितली आहे.

नास्नोळा येथे २ हजार १५० चौरस मीटरच्या भूखंडाचा विभाग बदल करण्याची मागणी सत्व विलास यांनी केली आहे.

याशिवाय अन्य छोट्या आकारांचे भूखंड मिळून रुपांतरीत करण्याचे हे प्रस्ताव आहेत.

कोरगावात ९,२१५ चौ. मी.चा भूखंड

नगरनियोजन मंडळाने कोरगाव येथील ९ हजार २१५ चौरस मीटरचा भूखंड रुपांतरीत करण्यास मेबेरी इस्टेटस यांना परवानगी दिली आहे. याशिवाय १३६ ते ३८७ चौरस मीटर आकाराचे ३४ भूखंड रुपांतरीत करण्यासही परवानगी दिली आहे. त्‍यात नैसर्गिक आच्छादन असलेल्या तसेच झुडूपाखालील भूखंडांचा समावेश आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT