MLA Sankalpa Amonkar dainik gomantak
गोवा

मुरगावातील प्रकल्‍पांचा फायदा स्‍थानिकांपेक्षा परप्रांतीयांनाच!

मुरगाव मतदारसंघात गोवा शिपयार्ड, मुरगाव पोर्ट ट्रस्‍ट हे मोठे प्रकल्‍प आहेत. येथील बंदरातून मोठ्या प्रमाणात कोळशाची वाहतूक केली जाते.

दैनिक गोमन्तक

पणजी: मुरगाव मतदारसंघात अनेक मोठमोठ्या सरकारी आणि खासगी कंपन्‍या आहेत. गेली अनेक वर्षे कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या या कंपन्‍यांचा स्‍थानिकांना काहीच फायदा होत नाही. उलट येथील अनेक प्रकल्‍पांमुळे मुरगाववासीयांना विविध प्रकारचा त्रास सहन करावा लागतो, फायदा मात्र बिगरगोमंतकीय घेत आहेत, अशा शब्दांत मुरगावचे आमदार संकल्‍प आमोणकर यांनी सरकारवर हल्लाबोल केला. अर्थसंकल्‍पावर चर्चेदरम्‍यान ते बोलत होते.

(Projects in Murgaon benefit foreigners more than locals)

मुरगाव मतदारसंघात गोवा शिपयार्ड, मुरगाव पोर्ट ट्रस्‍ट हे मोठे प्रकल्‍प आहेत. येथील बंदरातून मोठ्या प्रमाणात कोळशाची वाहतूक केली जाते. यात मोठमोठ्या कंपन्‍यांचा सहभाग आहे. मात्र येथील कर्मचारी आणि कामगार गोव्‍याबाहेरील आहेत. कोळसा प्रदूषणाचा त्रास स्‍थानिकांना सहन करावा लागतो तर आर्थिक लाभ इतर लोक घेत असल्‍याचा आरोप आमोणकर यांनी केला. गेली अनेक वर्षे मुरगाव मतदारसंघाचा विकासच झालेला नाही, असे ते म्‍हणाले.

बायणा समुद्रकिनाऱ्यावर पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांसाठी कोणत्‍याही सुविधा नाहीत. मासेमारीद्वारे आपला उदरनिवार्ह करणाऱ्या या समाजाकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. या ठिकाणी सुमारे 300 ते 350 पारंपरिक मच्‍छीमार आहेत. किनारी कायद्यामुळे त्‍यांच्‍या व्‍यवसायावर बंधने आली असून पावसाळ्यात त्‍यांना आपल्‍या होड्या अन्‍यत्र नेऊन ठेवाव्‍या लागतात. कोणतीही सुविधा नाही, असे आमोणकर म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT