काँग्रेस आमदारांना फोडण्यासाठी दिले मंत्रिपदाचेही आमिष

मायकल लोबो, दिगंबर कामत यांच्याकडून फोडाफोडीचे प्रयत्न सुरूच
Goa Congress MLA | Goa Live Update
Goa Congress MLA | Goa Live UpdateDainik Gomantak

मडगाव : काँग्रेसमध्ये आमदार फोडण्यासाठी झालेला उठाव आम्ही मोडून काढला अशा शेखी काँग्रेस नेते मारत असले तरी पडद्यामागून हालचाली अजूनही सुरूच आहेत. काँग्रेसचे बडे मासे गळाला लागावेत यासाठी आता त्यांना मंत्रिपदाच्या ऑफर्स दिल्या जात आहेत.

बंडखोरांना आठ आमदारांचा जादुई आकडा जुळविण्यासाठी अजूनही दोन आमदार कमी पडत आहेत. त्यामुळे युरी आलेमाव, एल्टन डिकॉस्ता, रुडोल्फ फेर्नांडिस आणि संकल्प आमोणकर यांच्यापैकी दोघांना आपल्या गोटात ओढण्यासाठी दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांनी आजही शर्थीचे प्रयत्न केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.

नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा हे जरी सोमवारी काँग्रेसचे केंद्रीय नेते मुकुल वासनिक यांच्या बरोबर दिसले तरी त्यांचा कल काँग्रेस बंडखोरांकडेच असल्याचे सांगितले जात असून सिक्वेरा हे फुटून भाजपात यावेत यासाठी त्यांना मंत्रिपदाची ऑफर देण्यात आल्याची माहिती खात्रीपूर्वक सूत्रांकडून मिळाली. ही फूट कोणत्याही परिस्थितीत घडून यावी यासाठी आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सर्मा हे स्वतः प्रयत्न करत आहेत. सर्मा यांनीच सुरवातीला कामत यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बरोबर बैठक घडवून आणली होती.

अगदी काल मंगळवारी सकाळीही आमच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न झाला पण आमचे किमान सहा आमदार स्थिर असल्याने कामत व लोबो यांच्या प्रयत्नांना यश आले नाही अशी माहिती काँग्रेसच्या एका जबाबदार पदाधिकाऱ्याने दिली.

Goa Congress MLA | Goa Live Update
कोलवाळ कारागृहातील कैद्याकडील मोबाईल काही सापडेना

मिळालेल्या माहितीनुसार, युरी आलेमाव, एल्टन डिकॉस्ता, व रुडॉल्फ फर्नांडिस यांनी बंडखोरीत सामील होण्यास पूर्णपणे नकार दिल्याने संकल्प आमोणकर हे गळाला लागू शकतात यासाठी प्रयत्न चालू होते. आ. कार्लोस फेरेरा हे सुरवातीला या बंडखोरांसह होते. पण, मतदारसंघातून त्यांच्यावर भाजपात न जाण्यासाठी दबाव आल्याने तेही काहीसे डळमळीत झाल्याची माहिती आहे. असे जरी असले तरी बंडखोरांच्या नेत्यांनी अजून आपले प्रयत्न सोडलेले नाहीत. कुठल्याही प्रकारे आम्ही काँग्रेस पक्ष फोडूच असा विश्‍वास त्या गोटातून व्यक्त होत आहे.

दरम्यान भाजपकडून मंत्रिपदाच्या ऑफर्स आमच्या आमदारांना दिल्या जातात ही गोष्ट खरी आहे. मात्र, त्यांचेच 12 मंत्री असताना ते आणखी कितीजणांना मंत्री करतील हाच मोठा प्रश्न आहे. आमच्या आमदारांनाही त्याची कल्पना आहे. त्यामुळे ते या आमिषांना बळी पडतील असे मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया गोवा काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी दिली आहे.

तर सोमवारी आम्ही विधिमंडळ गटाची बैठक घेतली. त्यावेळी एक दिगंबर कामत सोडल्यास अन्य दहा आमदार त्या बैठकीला उपस्थित होते. सुरुवातीला त्यांना फोडण्याचे प्रयत्न झाले हे खरे आहे. परंतु त्या आमदारांना आता जाण आली आहे. त्यामुळे आता ते फुटण्याची चूक करणार नाही असे मला वाटते, असं गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com