Goa Navratri 2023 Dainik Gomantak
गोवा

Goa Navratri 2023: बाणावली येथील लक्ष्‍मी मंदिरात नवरात्रोत्‍सवानिमित्त कार्यक्रम

Goa Navratri 2023: बाणावली येथील श्री लक्ष्‍मी देवालयात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम सुरू असून, त्‍यास उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Navratri 2023: बाणावली येथील श्री लक्ष्‍मी देवालयात नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम सुरू असून, त्‍यास उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळत आहे. उद्या रविवार दि. 22 ऑक्‍टोबर रोजी सकाळी 8 वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रम, 11 वाजता सुवासिनींकडून महालक्ष्मी षोडशोपचार पूजा, श्री ललिताष्टोत्तर शतनामावली कुंकुमार्चन होईल. यजमानपद संजय लक्ष्मण वेर्णेकर (कोलवा) यांना लाभले आहे.

संध्याकाळी ६.३० वाजता युवा स्वरनाद, पर्वरी प्रस्तुत ‘पावन नवरात्री’ हा भावगीत, भक्तिगीत व मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री ८ वाजता मखरोत्सव, ८.३० वाजता श्री लक्ष्मी देवालय युवा घुमट आरती मंडळातर्फे (बाणावली) घुमट आरती व नंतर महाप्रसाद होणार आहे.

सोमवार दि. २३ रोजी सकाळी होणाऱ्या विविध धार्मिक विधींचे यजमानपद अॅड. रमाकांत बाबली वेर्णेकर (कोलवा) यांना लाभले आहे. दुपारी १२ ते १ पर्यंत कुमारीपूजन. संध्याकाळी ६ वाजता नंदकिशोर देसाई (पेडणे) यांचे कीर्तन, रात्री ८ वाजता मखरोत्सव, ८.३० वाजता रामनाथ दामोदर आरती मंडळातर्फे (शिरोडा) घुमट आरती व नंतर महाप्रसाद होईल.

मंगळवार दि. २४ रोजी देवस्‍थान समितीतर्फे विजयादशमी (दसरा) उत्‍सव साजरा करण्‍यात येणार आहे. सकाळी श्रींस अभिषेक. दुपारी १२ वाजता श्री देवी महालक्ष्मीची पालखीत्‍सव, सिमोल्लंघन, शमीपूजन व सोने लुटणे, दुपारी १ वाजता श्री लक्ष्मी देवालय युवा घुमट आरती मंडळातर्फे (बाणावली) घुमट आरती व नंतर महाप्रसाद होणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्‍येने उपस्‍थिती लावावी, असे आवाहन देवस्‍थान समितीतर्फे करण्‍यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT