Panjim Traffic Jam
Panjim Traffic JamDainik Gomantak

Panjim Traffic Issue: पणजीत वाट मिळणे कठीण!

Panjim Traffic Issue: पुन्हा खोदकाम : ‘स्‍मार्ट’ कामांमुळे वाहतुकीवर परिणाम
Published on

Panjim Traffic Issue: राजधानी पणजीत स्मार्ट सिटीची कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे काही रस्त्यांवर वाहतूक बंद केल्याने शहरातील इतर मार्गावरून वाहतूक वळविण्यात आले आहेत. चार चाकी वाहनांना मात्र वाहतूक वळविलेल्या ठिकाणावरून जावे लागते. पण दुचाकीस्वार काम बंद असलेल्या ठिकाणी पदपथावरून वाहन हाकून वाट काढण्यात पटाईत झाले आहेत, असेच चित्र दिसू लागले आहे.

Panjim Traffic Jam
Marina Project: सांतआंद्रे मतदारसंघातील मरिना प्रकल्पाच्या विरोधात दसऱ्याला सभा : वीरेश बोरकर

सध्या आत्माराम बोरकर आणि महात्मा गांधी रस्ता, असे जोडणारे मध्यवर्ती असणाऱ्या रस्त्यांवर खोदकाम सुरू आहे. काही ठिकाणी मलनिस्सारण वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे, त्यासाठी चेंबरसाठी खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे वाहतूक वळविलेल्या ठिकाणी एकही वाहतूक पोलिस दिसत नाही, हे सर्वात महत्त्वाची बाब मानली जात आहे. त्यामुळे दुचाकीस्वार सध्या कोठूनही मार्ग काढत आहेत.

Panjim Traffic Jam
Youth Trekker: साद घालती उंच शिखरे!

राजधानीत स्मार्ट सिटीची कामे सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडी होणार आणि नागरिकांना व वाहनधारकांना त्याचा त्रास होणार, अशी भीती ‘गोमन्तक’ने काही आठवड्यांपूर्वीच व्यक्त केली होती. आता मलनिस्सारणाची वाहिनी टाकण्याचे काम होताच, रस्ते स्मार्ट करण्याचे काम हाती घेतले जाईल, तेव्हा खरी पणजीकरांच्या मानसिकतेची कसोटी लागणार असल्याची प्रतिक्रिया येथील प्रसिद्ध हॉटेल व्यावयायिकाने व्यक्त केली.

होमगार्ड तरी नेमा

चर्चस्क्वेअरजवळ डॉमिनोजसमोर रस्त्यावर खोदकाम करण्यात आलेय. त्यासाठी वाहतूक बंद करण्यात आल्याने सर्व वाहने १८ जूनमार्गे जात होती. परंतु दुचाकीस्वार मात्र येथील पदपथावरून मार्ग काढत होते. वाहतूक पोलिसांना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमुळे इतरत्र नेमणूक दिली असली तरी राजधानीत किमान होमगार्ड तरी नियुक्त करावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com