Babu Ajgaonkar and Governor Rajendra Arlekar Dainik Gomantak
गोवा

Governor: आर्लेकर हिमाचल गयेला है, आपुनको मजा आयेला है; क्रिडामंत्री

हिंदी भाषेवरील प्रभुत्वाचा विचार त्यांची हिमाचल प्रदेशचे राज्यपाल (Governor) म्हणून नियुक्ती करताना केला गेला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: माजी सभापती राजेंद्र आर्लेकर (Rajendra Arlekar) यांचे हिंदी भाषेवरील प्रभुत्वाचा विचार त्यांची हिमाचल प्रदेशचे (Himachal Pradesh) राज्यपाल (Governor) म्हणून नियुक्ती करताना केला गेला आहे, असे सांगण्यात येते. याच पार्श्वभूमीवर क्रीडामंत्री बाबू आजगावकर (Babu Ajgaonkar) यांच्या हिंदीची (Hindi) टवाळी करण्यासही कोणी मागे-पुढे पाहात नाहीत. मागे राष्ट्रीय प्रसार माध्यमांच्या स्थानिक प्रतिनिधींशी वार्तालाप करताना त्यांनी हिंदीची अशी मोडतोड केली, की त्याची ध्वनिचित्रफित अनेकांनी विरंगुळा म्हणूनही पाहिली. ‘आता आर्लेकर हिमाचल गयेला है. आपुनको मजा आयेला है. क्रीडामंत्री’ असे वाक्य समाजमाध्यमावर फिरवून आजगावकर यांच्या हिंदीचा पंचनामा सुरू झाला आहे. (Proficiency in Hindi language benefited Rajendra Arlekar when he was appointed as the Governor of Himachal Pradesh)

दरम्यान राज्यात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात फैलावत असल्याने सरकारने कोरोना मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले होते. लग्नसोहळा व इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी 50 टक्क्यांपेक्षा उपस्थिती असू नये असे स्पष्ट केले होते. अशातच उपमुख्यमंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर हे गर्दी असलेल्या मडगावातील एका कार्यक्रमात डान्स करतांना दिसले होते. आणि त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल झाल्याने लोकप्रतिनिधी असूनही त्यांनी केलेल्या या उल्लंघनाबद्दल लोकांनी संताप व्यक्त केला होता.

कार्यकर्तेही जाण्यास उत्सुक

आर्लेकर यांच्या शपथविधीसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, सरचिटणीस ॲड. नरेंद्र सावईकर, संघटन सचिव सतीश धोंड आदी उपस्थित राहण्याचे निश्चित असून या यादीत परवापर्यंत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. पक्षाचे काही नेते व कार्यकर्ते शिमला येथे जाण्याची तयारी करू लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT