Priyanka Gandhi Dainik Gomantak
गोवा

मडगावात प्रियांका गांधीच्या सभेची जय्यत तयारी!

केंद्रीय राखीव दलाकडून सभास्थानाची तपासणी : शहरात झेंडे लावून वातावरण निर्मिती.

दैनिक गोमन्तक

मडगाव : ऐन निवडणुकीच्या काळात गोव्यात काँग्रेसला एक प्रकारची मरगळ आलेली असताना उद्या प्रियांका गांधी या एका दिवसाच्या गोवा भेटीवर येणार असून ही भेट काँग्रेस कार्यकर्त्यांत चैतन्य आणू शकेल का ? सध्या गोव्यातील राजकीय वर्तुळात हाच प्रश्न चर्चेत असून गोव्यातील काँग्रेस कार्यकर्ते या भेटीकडे उत्सुकतेने पाहत आहेत. उद्या प्रियांका गांधी यांची मुख्य सभा आके मडगाव येथील कॉस्ता मैदानावर होणार असून या सभेला किमान 5 हजार लोक उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जाते. ही सभा काही उमेदवारीच्या इच्छुकांसाठी शक्ती प्रदर्शन करण्याचीही संधी असेल.

उद्या सकाळी प्रियांका गांधी यांचे गोव्यात आगमन झाल्यावर त्या थेट असोलणा येथे जाऊन लोहिया चौकावर हुतात्मा स्मारकाला वंदन करणार असून त्यानंतर कुंकळ्ळी मार्गे त्या मोरपिर्ला येथे जाऊन तिथल्या आदिवासी महिलांची दुखणी ऐकून घेणार आहेत. त्या दुपारचे जेवण तिथेच करतील. त्यांनंतर दुपारी 4 च्या सुमारास मडगावच्या एमसीसी सभागृहात त्या 'मोले वाचवा' या मोहिमेतील मुलांशी चर्चा करणार असून त्यानंतर 5 वाजण्याच्या सुमारास कॉस्ता मैदानावर भरणाऱ्या 'प्रियदर्शनी' या महिला मेळाव्यात भाग घेणार आहेत. तिथून त्या चिखली येथे जाणार असून तिथे होणाऱ्या मेळाव्यात त्यांच्या उपस्थितीत काही कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.

प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या सभा ज्या ठिकाणी होणार तिथे काँग्रेसचे झेंडे लावून वातावरण निर्मिती करण्यात आली असून मडगावात (Margao) रस्त्यावरही अशा तरेची वातावरण निर्मिती केली आहे. प्रियांका गांधी यांना झेड प्लस सुरक्षा असल्याने आज केंद्रीय सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सभास्थळांची पाहणी केली. त्यांच्या सभेला स्थानिक पोलिसांचीही कडेकोड सुरक्षा ठेवण्यात येणार असून दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक स्वतः देखरेख करणार असून मडगाव, फातोर्डा, सांगे आणि केपे या चारही पोलीस स्थानकातील फौजफाटा सभास्थळी तैनात केला जाणार आहे अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT