नवनिर्वाचित साकवाळ समितीने नाईक आणि नार्वेकर यांच्यावर केले खळबळजनक आरोप!

तसेच कोमुनिदाद कायद्याच्या अलिखित नियम निर्बंधा अंतर्गत या प्रकरणी चौकशी करावी अशी मागणी म्हार्दोळकर यांनी केली.
Press conference
Press conferenceDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को : साकवाळ कोमुनिदादची जागा खाजगी करून विकण्याचा प्रयत्न अध्यक्ष दामोदर नाईक व ऍटर्नी सतीश नार्वेकर यांनी केला असल्याचा खळबळजनक आरोप नवनिर्वाचित साकवाळ कोमुनिदाद समितीने केला आहे. जागेसाठी 22 लाख रुपये संतान नानू याने पुंडलिक गावकर यांच्या मध्यस्थीतून दामोदर नाईक, सतीश नार्वेकर व इतरांना दिले असल्याची माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष प्रताप म्हार्दोळकर यांनी दिली आहे. तसेच कोमुनिदाद कायद्याच्या अलिखित नियम निर्बंधा अंतर्गत या प्रकरणी चौकशी करावी अशी मागणी म्हार्दोळकर यांनी केली.

Press conference
गोव्यामध्ये बॉडीबिल्डिंग स्पर्धेचे आयोजन!

वास्को (Vasco) येथे आयोजित पत्रकार परिषदेतून (Press conference) वरील माहिती साकवाळ कोमुनिदाद नवनिर्वाचित सदस्यांनी दिली. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष प्रताप म्हार्दोळकर, अँर्टनी जयेश फडते, खजिनदार श्रीनिवास नाईक व इतर सदस्य उपस्थित होते. पुढे माहिती देताना प्रताप म्हार्दोळकर म्हणाले की साकवाळ कोमुनिदाद मधील भागधारकांनी 2022-24 पर्यंत नवीन समिती निवडून एका प्रकारे नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. विद्यमान सांकवाळ कोमुनिदाद समितीच्या कार्यकाळ मार्च 2022 मध्ये संपुष्टात येणार आहे. नंतर प्रताप म्हार्दोळकर यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती आपला कार्यकाळ सांभाळणार असल्याची माहिती म्हार्दोळकर यांनी दिली.

विद्यमान साकवाळ कोमुनिदाद अध्यक्ष दामोदर नाईक, अँटनी संतोष नार्वेकर यांनी कोमुनिदादाची जागा 22 लाख रुपयांनी रस्त्यासाठी विकण्याचा प्रयत्न केला होता. सदर सांतान नानू याने पुंडलिक गावकर यांच्या मध्यस्थीने साकवाळ कोमुनिदाद अध्यक्ष दामोदर नाईक व अँटनी संतोष नार्वेकर, नानू यांना जागेसाठी रस्ता करण्यासाठी 22 लाख रुपये घेतले असल्याची लिखित माहिती अध्यक्ष दामोदर नाईक यांनी कोमुनिदाद कायद्याच्या अलिखित नियम निर्बंध प्रशासनात दिली असल्याची माहिती प्रताप म्हार्दोळकर यांनी दिली. यात दामोदर नाईक, सतीश नार्वेकर व इतर सदस्य सुद्धा गुंतलेले असून त्यांच्यावर सुद्धा कोमुनिदाद कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी म्हार्दोळकर यांनी केली.

Press conference
वास्कोच्या रहिवाशांचे विविध क्षेत्रात योगदान आमदार आत्मेदांकडून सत्कार!

कोमुनिदाद मध्ये यापूर्वीसुद्धा जमीन घोटाळा झाला असल्याचा संशय प्रताप म्हार्दोळकर यांनी व्यक्त केला आहे. तसेच दामोदर नाईक यांनी आपल्या कार्यकाळात साकवाळ कोमुनिदाद मध्ये सल्लागार म्हणून नारायण दत्ता नाईक यांची नियुक्ती करून कोमुनिदादच्या जागा विकण्याचा कट रचला होता अशी माहिती म्हार्दोळकर यांनी दिली. सांकवाळ कोमुनिदादची जागा 22 लाखासाठी विकून दामोदर नाईक यांनी आणखीन पैशाची मागणी केली असल्याचा माहिती म्हार्दोळकर यांनी दिली. सदर तक्रार 3 मे 2021 कोमुनिदाद कायद्याच्या अलिखित नियम निर्बंध प्रशासनात देण्यात आली असल्याची माहिती प्रताप म्हार्दोळकर यांनी दिली आहे.

दामोदर नाईक यांनी नारायण नाईक यांना साकवाळ कोमुनिदाद मध्ये सल्लागार नेमून फक्त कोमुनिदादच्या जागा परस्पर विकण्याचा कट रचला होता. यापूर्वीसुद्धा नारायण नाईक यांनी 2001/2021 मध्ये कोमुनिदादाची एक लाख जागेपैकी 40 हजार चौरस मीटर जागा विकली असल्याची माहिती म्हार्दोळकर यांनी दिली. कोमुनिदाद जागा विकण्यापूर्वी आमसभा घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. पण दामोदर नाईक यांनी कोमुनिदाद नियमाचे सदैव उल्लंघन केले असल्याची माहिती म्हार्दोळकर यांनी दिली.

Press conference
कोविडमुळे मृत्यू झालेल्यांच्या 516 कुटुंबियांना गोवा सरकारचा आधार

याप्रसंगी प्रताप म्हार्दोळकर यांनी पत्रकारांना माहिती देताना म्हणाले की दाबोळी कोमुनिदाद समिती गेल्या अनेक वर्षापासून अस्तित्वात नसल्याने सदर दाबोळी कोमुनिदादमध्ये विलीनीकरण करावी अशीही मागणी केली आहे. याविषयी सांकवाळ कोमुनिदाद प्रयत्न करणार असल्याची माहिती म्हार्दोळकर यांनी दिली. दाबोळी कोमुनिदाद सांकवाळ कोमुनिदादच्या जवळ असल्याने कोमुनिदाद कायद्याअंतर्गत सदर जागा साकवाळ कोमुनिदादमध्ये विलीनीकरण करता येते अशी ही माहिती शेवटी प्रताप म्हार्दोळकर यांनी दिली.

दरम्यान याविषयी आरटीआय कार्यकर्ते नारायण नाईक यांचा खुलासा घेतला असता, सदर 2022/24 पर्यंत साकवाळ कोमुनिदाद समितीवर निवडून आलेल्या सदस्यांच्या विरोधात अपात्रता याचिका उच्च न्यायालयात 16 डिसेंबर 2021 रोजी सुनावणीसाठी येणार असल्याने प्रताप म्हार्दोळकर बिनबुडाचे आरोप करीत आहे. सर्व सदस्यां विरोधात न्यायालयात टांगती तलवार असल्यानेच स्वतःला सांभाळण्यासाठी माझ्यावर आरोप करीत असल्याचे 2022/24 च्या समितीत बिनविरोध निवडून आलेले सदस्य नारायण नाईक यांनी सांगितले.

2009 ते 11 मध्ये 40 हजार चौरस मीटर जागा विकली असेल तर माझ्यावर न्यायालयात पोलिसात तक्रार का? दाखल केली नाही. सदर 2022 चे अध्यक्ष प्रताप म्हार्दोळकर यांने कोमूनिदादच्या जागेत अतिक्रमण करून बेकायदेशीर घरे बांधली असून याविरोधात अनेक तक्रारी सरकारी पातळीवर केल्या असून त्याविरोधात लवकरच कारवाई करण्यात येईल अशी माहिती शेवटी नारायण यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com