Goa To Pune Ambulance Accident Dainik Gomantak
गोवा

Sawantwadi: गाय आडवी आल्याने अपघात! गोव्यातून पुण्याकडे जाणारी रुग्णवाहिका पलटी, वृद्ध महिला जखमी

Goa To Pune Ambulance Accident: गोव्यातून पुण्याकडे निघालेल्या खासगी रुग्णवाहिकेचा गुरुवारी (१० एप्रिल) अपघात झाल्याची माहिती समोर आलीय.

Sameer Amunekar

सावंतवाडी: गोव्यातून पुण्याकडे निघालेल्या खासगी रुग्णवाहिकेचा गुरुवारी (१० एप्रिल) अपघात झाल्याची माहिती समोर आलीय. सावंतवाडी-माजगाव येथील माटव हॉटेलजवळ ही दुर्घटना घडली. रस्त्यावर अचानक गाय आडवी आल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि रुग्णवाहिका रस्त्याच्या कडेला उलटली.

या अपघातात रुग्णवाहिकेतून उपचारासाठी पुण्याकडे नेत असलेल्या वृद्ध महिलेला दुखापत झाली आहे. महिलेला तत्काळ सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णवाहिकेत असलेल्या इतर ४ जणांना किरकोळ दुखापत झालीय.

जीवितहानी टळली

अपघातात उबाल्डा डिसोजा (वय- ७९) यांच्यासह परिचारिका बेनिता अल्मेडा (वय- ६१), जेसीता फर्नांडिस (वय ५०) आणि इसीजा फर्नांडिस (वय ५०) यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. सुदैवानं या अपघातात कोणाचाही जीवितहानी झाली नाही.

घटनेची माहिती मिळताच, सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त रुग्णवाहिकेतील जखमींना बाहेर काढत त्यांनी सावंतवाडी रुग्णालयात दाखल केलं.

रुग्णवाहिकेचे नुकसान

या अपघातात रुग्णवाहिकेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. या अपघातामुळे रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वारंवार घडणाऱ्या अशा अपघातांमुळे नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa vs Oman: अभिनव, शिवेंद्र, कौशिक विजयाचे शिल्पकार; आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या ओमान संघावर 6 विकेट्सनी मात

14 राज्ये, 80 पेक्षा जास्त एफआयआर अन् 200 हून अधिकांना बेड्या! ISIच्या शहजाद भट्टी नेटवर्कचा पर्दाफाश; भारतीय सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई

Margao Vegetable Vendors: महिला भाजी विक्रेत्यांना मडगावात जागा उपलब्ध करणार; दिगंबर कामत

Navpancham Yog 2026: आर्थिक भरभराट अन् नोकरीत प्रमोशन! 4 राशींसाठी 'नवपंचम योग' ठरणार जॅकपॉट; करिअरला मिळणार रॉकेटसारखी गती

Goa Rooftop Solar Scheme: छतावर सोलर लावा अन् मिळवा 2.20 लाखांपर्यंत अनुदान; गोव्यात नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT