COLVALE JAIL Dainik Gomantak
गोवा

Colvale Jail : कोलवाळ कारागृहात कैद्याचा कापला कान

कैद्यांच्या हाणीमारीतून घडली घटना; दोघे जखमी

गोमन्तक डिजिटल टीम

Colvale Jail : कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये झालेल्या हाणामारीच्या भांडणात एका नायजेरियनचा कान कापला गेला. ही घटना रविवारी (11 सप्टेंबर) रात्री 7.30 च्या सुमारास घडली. यात ओनेका इगीली या कैद्याचा कानचा भाग कापला गेला असून सध्या त्याच्यावर म्हापसा येथील जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत. तर इझेजी किंगस्ली याच्या डोक्याला जखम झाली असून त्यास उपचारानंतर कारागृहात माघारी पाठवण्यात आले.

रविवारी सायंकाळी कैद्यांनी जेवण केल्यानंतर मोजणीवेळी हा प्रकार घडला. जखमी इझेजी हा कारागृहात शौचाला गेला होता. त्यामुळे कैद्यांची संख्या कमी दिसत होती. पुन्हा मोजणी वेळी तो परत आला. त्यावेळी जेलगार्डने त्यास जाब विचारला. त्यावेळी काही कैदी तेथे आले. त्यांनी इझेजी यास मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी ओनेका हा व इतर कैदी त्याच्या मदतीला आले. त्यांच्या व इतर कैद्यांमध्ये जुंपली. या हाणामारीवेळी ओनेका याच्या कानाचा एका कैद्याने चावा घेतला. त्यामुळे त्याच्या डाव्या कानाचा भाग यावेळी बहुतेक कथितरित्या कापून खाली पडण्यापर्यंत कापला गेला. सुरक्षारक्षकांनी धाव घेतल्याने वाद मिटला. रात्री उशिरापर्यंत कारागृह प्रशासनाने याविषयी कोलवाळ पोलिसांत तक्रार दिली नव्हती.

मुख्यमंत्र्यांनी नुकतीच दिली होती भेट

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गेल्या आठवड्यात मंगळवारी (ता.6) कोलवाळ कारागृहाला भेट दिली होती. कारागृहात ड्रग्स तस्करी, डॉक्टरांना मारहाण, पलायन, कैद्यांतील वाढती भांडणे सातत्याने घडत असल्याने त्यांनी दखल घेत कारागृहात अनेक ठिकाणी पाहणी केली व सुरक्षा-व्यवस्थेचा आढावा घेतला. मात्र, त्यांच्या भेटीला आठवडा ही होत नाही, तोवर ही घटना घडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT