Savoi-Verem
Savoi-Verem  Dainik Gomantak
गोवा

Savoi-Verem : सत्यवती यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार; ‘श्रमधाम’तर्फे पायाभरणी

गोमन्तक डिजिटल टीम

Savoi-Verem :

सावईवेरे, सभापती रमेश तवडकर यांच्या संकल्पनेतून बलराम श्रमधाम योजनेतून प्रियोळ मतदारसंघातील केरी ग्रामपंचायत क्षेत्रातील परवारवाडा येथील श्रीमती सत्यवती परवार यांच्या घराचे स्वप्न साकार होत आहे.

शुक्रवारी रमेश तवडकर यांच्या हस्ते पायाभरणी सोहळा पार पडला. प्रियोळ मतदारसंघात ७ घरे बांधण्याच संकल्प करण्यात आला आहे, असे तवडकर यांनी स्पष्ट केले.

या सोहळ्यास सभापतीसह केरीच्या सरपंचा तृप्ती नाईक, उपसरपंच सुलक्षा जल्मी, पंच तुळशीदास नाईक, माजी सरपंच रोहिदास केरकर, अशोक गावडे, खोतीगावचे सरपंच आनंदू देसाई, वेरे-वाघुर्मे माजी उपसरपंच रूपा नाईक, विनय गावकर, शिवाजी गावडे, ॲड. सुषमा गावडे, मोलू परवार, दत्ताराम गावडे, राजेश परवार, व्यंकटेश परवार इत्यादी उपस्थित होते.

काणकोणचे सुमारे ४० कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक श्रमदानात सहभागी होऊन त्यांच्या घराच्या बांधकामाला प्रारंभ केला.काणकोण मधील सरपंच, उपसरपंच, पंच सदस्य, पदवीधर इत्यादी अनेक स्वयंसेवकांचा यात समावेश होता.

तवडकर म्हणाले, श्रमधाम योजनेतून प्रियोळ मतदारसंघातील अत्यंत गरीब व गरजवंत अशा ७ व्यक्तींच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. या योजनेअंतर्गत काणकोण मध्ये एकूण २० गरजवंतांना घरे बांधून दिली. संपूर्ण गोमंतकात अजूनही २ ते ३ टक्के माणसांना राहण्यासाठी पक्की घरे नाहीत.

त्यामुळे श्रम धाम योजनेतून अशा गरजवंतांना घरे मिळावीत या उद्देशाने अनेक स्वयंसेवकांच्या सहकार्याने ही योजना यशस्वी होताना दिसत आहे. प्रियोळ मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांना देखील ही संकल्पना भावल्यामुळे या मतदारसंघातून मदतीचे अनेक हात पुढे सरसावले आहेत. येत्या १ जून रोजी कार्यकर्त्यांचे मोठे अधिवेशन भरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: चिखलीत इनडोअर स्टेडियमची भिंत कोसळली

Jammu & Kashmir Terrorist Attack: कठुआमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; भारतीय लष्कराचे 4 जवान ठार, 6 जखमी

Nilesh Cabral: निलेश काब्राल यांचा थेट CM पदावरच डोळा?; मंत्रिमंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान

Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली

Mumbai Goa Highway: निवारा शेडविना प्रवाशांचे हाल; पेडणे तालुक्याची समस्या

SCROLL FOR NEXT