Priol Politics Dainik Gomantak
गोवा

Priol Political Crisis: प्रियोळात सत्तेसाठी चढाओढ सुरू! माशेल, खांडोळा, भोम पंचायतीत अस्थिरता; ग्रामस्थांत नाराजीचा सूर

Priol Politics: गेल्या दोन महिन्यात पंचायत पातळीवर हेवेदावे वाढले असून सत्तेसाठी चढाओढ सुरू आहे. सरपंचावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला, परंतु तेथे विरोधकांचा फज्जा उडाला.

Sameer Panditrao

खांडोळा: प्रियोळ मतदारसंघातील माशेल, खांडोळा, भोम पंचायतीत अस्थिरता असून सरपंच, उपसरपंचावर अविश्वास ठराव दाखल होत आहेत. सध्या गटातटांचे राजकारण सुरू असून विकासापेक्षा सत्तेसाठीच गट निर्माण होत आहेत. याबाबत ग्रामस्थांत नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.

चतुर्थी अवघ्या काही दिवसावर आली असताना स्वच्छता, वीज, पाणी, कचरा समस्या सोडविण्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. गेल्या दोन महिन्यात पंचायत पातळीवर हेवेदावे वाढले असून सत्तेसाठी चढाओढ सुरू आहे. सरपंचावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला, परंतु तेथे विरोधकांचा फज्जा उडाला.

पुन्हा विशांत नाईक सरपंच झाले. त्यानंतर तिवरे-वरगाव (माशेल) पंचायतीत सरंपच, उपसरपंचावर अविश्वास ठराव आणण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न झाले, पण एकत्र विरोधक एकत्र आलेच नाही, संख्याबळ कमी पडत होते.

पडद्यामागील वाटाघाटीत यश आले नाही. त्यामुळे अद्याप सरपंचदी जयेश नाईक कायम आहेत. पण उपसरपंचाची उचलबांगडी अचानक करण्यात आली. भोम-अडकोण पंचायतीत सरपंचावर बहुमतांने अविश्वास ठराव आणला आणि तो मंजूरही झाला. तेथेही सरपंचपदी लवकरच निवड होणार आहे.

प्रियोळ मतदारसंघातील या पंचायतीत अशा अस्थिरपणामुळे विकास खुंटला आहे. काही ठिकाणी मान्सूनपूर्व कामेच पूर्ण केली नसल्याने अनेक ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. कचरा समस्येने उग्र रूप धारण केले आहे.

सीसीटीव्ही यंत्रणा असूनही ती कुचकामी ठरत आहे. त्यामुळे पंचायत मंडळ असूनही विकासाबरोबरच स्वच्छता, सोयीसुविधांकडे कोणीच लक्ष देत नाहीत. जागोजागी जाहिरात फलक, वाढलेली झाडे, झुडपे यामुळे ग्रामस्थांना वाटचाल करणे कठीण होत आहे.

विजेचा लपंडाव!

माशेल, खांडोळा,भोम पंचक्रोशीत नेहमीच विजेचा लपंडाव सुरू आहे. २४ तासांत अनेक वेळा वीज गायब होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामान करावा लागत आहे. काही ठिकाणी पथदीपही बंद होत असल्‍यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्‍यावर अंधार पडत आहे. गेले दोन महिने वीजेचा लंपडाव कायम असून ग्रामस्थातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

पाणीही गायब!

काही वाड्यावर नळांला पाणीच येत नाही, आले तर त्यांचा दाब कमी असतो. अल्पकाळ पाणी येत असल्याने गृहीणींना अडचण निर्माण होत आहे, चतुर्थीपूर्व हा प्रकार बंद करावा आणि सुरळीत पाणी पुरवठा करावा, अन्यथा पाणी खात्याच्या कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात येईल, असा महिला वर्गातर्फे इशारा देण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोडलेला हात आणि पाय, लंगडी घालत आला पोलिस स्थानकात; ऑस्ट्रेलियन खेळाडुंची छेड काढणाऱ्या संशयिताला अटक Watch Video

Satish Shah: सलग 55 एपिसोडमध्ये साकारल्या 55 भूमिका, सतीश शाहांचे निधन; हसऱ्या चेहऱ्याचा पडला पडदा

गोव्यात प्रथमच पार पडली वजन-माप खात्याच्या नियंत्रकांची राष्ट्रीय परिषद; CM सावंतांनी दिली ग्राहकांच्या हक्काचे जतन करण्याची हमी

हाताशी आलेली भातशेती आडवी, पणजीत घराचे नुकसान; गोव्यात मान्सूनोत्तर पावसाचे धुमशान

आमदार दिलायला लोबोंचा भिंत बांधकामावर प्रत्युत्तर; आरोपांना दिले राजकीय हेतूचे वळण

SCROLL FOR NEXT