AAP  Dainik Gomantak
गोवा

Goa AAP: प्रियोळ मतदारसंघ हा दुर्लक्षित मतदार संघ

दैनिक गोमन्तक

पणजी: ज्या पद्धतीने आम आदमी पक्षाचे राज्यात कार्य विस्तारले आहे ते पाहता आम आदमी पक्षाला सत्ता निश्‍चित भेटणार आहे. दिल्ली मॉडेल गोव्यात राबवणे गरजेचे आहे. प्रियोळ मतदारसंघ हा दुर्लक्षित मतदार संघ आहे. या मतदारसंघात 30835 मतदार आहेत. या मतदारसंघात सात पंचायती, पंचावण्ण पंच आहेत, जिल्हा पंचायत सदस्य आहेत तरी देखील या मतदारसंघात विधानसभा निवडणूकीसाठी स्थानिक उमेदवार भेटत नाही हे न पटण्यासारखे आहे, असे प्रियोळ (Priol) मतदारसंघातील आम आदमी पक्षाचे (Goa AAP) उमेदवार नोनू चंद्रकांत नाईक म्हणाले.(Goa Assemblt Election 2022 Updates: Priol constituency is neglected constituency for goa assembly election)

मतदारसंघातील बेतकी-खांडोळा येथे अजून माध्यमिक विद्यालय नाही, मैदान नाही, मार्केट नाही. मात्र, सरकारी अधिकारी येथे आपले बंगले बांधून राहतात. बाणस्तारी बाजार प्रकल्प अजूनही प्रलंबित आहे. केरी पठारावरील जागेत जागेत नायलॉन 6-6 प्रकल्प उभारण्यात येणार होता. मात्र, या प्रकल्पाला प्रदूषणकारी करणारा म्हणून नाकारण्यात आले. त्यानंतर अजूनपर्यंत एकही पर्यावरणपूरक प्रकल्प का उभारला गेला नाही, याचा जनतेने विचार करावा. म्हार्दोळ (Mhardol) येथे अनेक देशी तसेच विदेशी पर्यटक येतात मात्र अजूनही येथे सार्वजनिक शौचालये किंवा प्रसाधने नाहीत. दीपक ढवळीकर व गोविंद गावडे यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करूनही त्यांना विकास साधता आला नसून, त्यांनी केवळ जनतेची फसवणूक केली, असा आरोप नोनू नाईक यांनी केला.

जनसेवेची संधी द्या

मला प्रसिध्द व्हायचे नसून, सिद्ध व्हायचे आहे. जनसेवेसाठी मला निवडून द्या. निवडूण आल्यास प्रियोळ मतदारसंघात पर्यावरण पूरक उद्योग आणले जातील. मार्शेलसाठी मास्टर प्लान केला जाईल. बेरोजगारीचा प्रश्‍न सोडविला जाईल, असे आश्वासन नोनू नाईक यांनी दिले.

दीपक व गोविंद (Govind Gawade) भांडणातच व्यस्त

प्रियोळ मतदारसंघाचा विकास न होण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे प्रियोळ मतदारसंघातील माजी आमदार दीपक ढवळीकर तसेच विद्यमान मंत्री गोविंद गावडे हे आहेत. त्यांनी स्थानिकांच्या प्रश्नांकडे लक्ष न देता उलटपक्षी मतदारसंघात भाडणे लावण्याचे काम करतात. मंत्र्यांच्या पीएला जरी कामासाठी भेटायचे असेल तर प्रियोळ मतदारसंघातील जनतेला मडकईला जावे लागते, याचा आता जनतेनेच विचार करावा, असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT