कुंकळ्ळी: काँग्रेसचा त्याग करून भाजपात गेलेले वेळ्ळी मतदारसंघाचे आमदार तथा जलस्त्रोत खात्याचे मंत्री फिलिप नेरी रॉड्रिगीस यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
रविवारी संध्याकाळी फिलिप नेरी यांनी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आपल्या राजकीय भवितव्याबाबत चर्चा केली. आपण वेळ्ळी मतदारसंघातून निवडणूक लढवावी का? निवडणूक लढायची झाल्यास अपक्ष म्हणून लढावे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Goa Congress) उमेदवारीवर लढावे यावर फिलिप यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे जाणून घेतले. कार्यकर्त्यांनी फिलिप यांना राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर निवडणूक लढण्यास आग्रह केला. (Minister Philip Neri Rodrigues likely to join NCP for Goa Assembly elections)
कार्यकर्त्यांच्या निर्णयाला मान देऊन फिलिप नेरी सोमवारी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा देणार आहेत. ते आमदारकीचा व भाजपाच्या सदस्यपदाचाही त्याग करणार आहेत. मंगळवारी फिलिप नेरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असून, शुक्रवारी ते आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे कार्यकर्त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
तृणमूलची (Goa TMC) धरली वाट, पण..!
कॉंग्रेसने जवळ न केल्यावर फिलिप यांनी तृणमूलची वाट धरण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, फिलिप यांच्यापूर्वीच वेळ्ळीचे माजी आमदार बेंजामिन सिल्वा यांनी तृणमूलमध्ये उडी घेतल्यामुळे फिलिप यांची संधी हुकली होती. फिलिप यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीत उतरण्याचा पर्याय खुला ठेवला होता. मात्र, शेवटी त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ स्वीकारले आहे. राष्ट्रवादीच्या (Goa NCP) चिन्हावर त्यांना कितपत यश मिळेल, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.
कॉंग्रेसमध्ये जाण्याचाही घेतला होता निर्णय
फिलिप नेरी रॉड्रिगीस काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर 2017 च्या निवडणुकीत निवडून आले होते. दोन वर्षांपूर्वी फिलिप नेरी यांनी इतर नऊ काँग्रेसी आमदारांसह काँग्रेस पक्षाचा त्याग करून भाजपात प्रवेश केला होता. त्यांना मंत्रिपदही बहाल करण्यात आले होते. निवडणूक जवळ आल्यावर फिलिप यांनी पुन्हा काँग्रेस पक्षात जाण्याचा प्रयत्न केला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.