Goa Election: उत्पल यांची नाराजी दूर करण्यासाठी अमित शहा 30 रोजी येणार गोव्यात

भाजपने जोरदार प्रचारालाही प्रारंभ केला असून, अमित शहा यांच्या गोवा दौऱ्यामुळे त्याला आणखी बळ येणार आहे, अशी माहिती भाजपचे गोवा प्रभारी सी. टी. रवी यांनी दिली.
Union Home Minister Amit Shah
Union Home Minister Amit ShahDainik Gomanatk
Published on
Updated on

पणजी: कोणत्याही परिस्थितीत पुन्हा राज्यात सत्ता मिळविण्याच्या तयारीत भाजप (Goa BJP) पक्ष असून, याला बळकटी येण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ३० जानेवारीला गोवा दौऱ्यावर येणार आहेत. ते या दौऱ्यात गोव्यातील जनतेशी, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. (Union Home Minister Amit Shah will arrive in Goa on 30th of January)

Union Home Minister Amit Shah
Goa Election 2022: मंत्री फिलिप नेरी रॉड्रिगीस राष्ट्रवादीच्या वाटेवर

राज्यातील नेत्यांशी चर्चा करून ते निवडणुकीपूर्व रणनिती ठरवणार आहेत. भाजपने (Goa BJP) जोरदार प्रचारालाही प्रारंभ केला असून, अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांच्या गोवा दौऱ्यामुळे त्याला आणखी बळ येणार आहे, अशी माहिती भाजपचे गोवा प्रभारी सी. टी. रवी यांनी दिली.

तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांनी गोव्यात भाजपला वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी राज्याच्या हितासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मनोहर पर्रीकर यांनी भाजपसाठी केलेले कार्य हे न विसरण्याजोगे आहे. त्यामुळे पर्रीकर पुत्र उत्पल यांनी आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असा सल्लाही सी. टी. रवी यांनी दिला. पर्रीकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उत्पल यांनी भाजपसोबत रहावे, असे असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com