National Games Goa 2023  Dainik Gomantak
गोवा

National Games 2023 Goa: अन्‌ क्रीडा क्षेत्र बहरू लागले!

National Games 2023 Goa: पंतप्रधान नरेंद्र मोदी : नकारात्‍मकता सोडून सकारात्‍मकता रुजविली

दैनिक गोमन्तक

National Games 2023 Goa: पूर्वीची सरकारे क्रीडा क्षेत्रासाठी आर्थिक तरतुदीसाठी संकोच करायची. खेळांवर खर्च कमी करावा अशी त्यांची मानसिकता होती. आता खेळांकडे युवा वर्गाला विकसित करण्याचे साधन म्हणून पाहिले जात आहे.

आर्थिक तरतूद तिप्पट झाली आहे. क्रीडाविषयक नकारात्मक मानसिकतेकडून सकारात्मक मानसिकतेकडे देशाचा प्रवास झाला.

त्याचमुळे खेळाडूंना प्रत्येक स्पर्धांत पदके मिळू लागली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्‍घाटन करताना नमूद केले. फातोर्डा येथील पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर हा सोहळा झाला.

पंतप्रधान म्हणाले, क्रीडा क्षेत्रात देश नवी उंची प्राप्त करत असतानाच या स्पर्धेचे गोव्यात आयोजन होत आहे. 70 वर्षात जे झाले नाही, ते आता होताना दिसत आहे. आशियाई पॅरालिंपिकमध्ये 70 हून अधिक पदके जिंकली आहेत.

अनेक विक्रम मोडले जात आहेत, नवे प्रस्थापित होत आहेत. जागतिक विद्यापीठ स्पर्धेतही उज्ज्वल यश मिळविले आहे. एकेक नवा इतिहास रचला जात आहे. ही येथील खेळाडूंसाठी प्रेरणा आहे.

नकारात्मकता, निराशा असेल तर क्रीडा क्षेत्राकडून अपेक्षाच बाळगता येणार नाही असे नमूद करून मोदी म्हणाले, देशात आर्थिक सुबत्ता आली आहे. सकारात्मकता रुजवली गेली आहे. परिणामी क्रीडाक्षेत्रही बहरलेले दिसत आहे.

गेल्या 30 दिवसांच्या सरकारच्या कारभारावर नजर टाकली तरी विकसित भारत निर्मितीसाठी आणि युवा वर्गाचे भविष्य सुरक्षित कऱण्यासाठी किती पावले टाकली याचा अंदाज येतो. वानगीदाखल म्हणून ही उदाहरणे दिली आहेत.

ऑलिपिंकसाठी विशेष प्रशिक्षण

क्रीडा क्षेत्राचे मोठे क्षितीज सर्वांना खुणावत आहे, देशात गुणवंत खेळाडूंची कमतरता नाही. मात्र ते हेरण्याची व्यवस्था नव्हती. ऑलिपिंकमध्ये पदकांच्या यादीत देशाचे नाव खालच्या पातळीवर पाहून वाईट वाटायचे. आता ही स्थिती पालटायची आहे. ‘खेलो इंडिया’च्या माध्यमातून ३ हजार जण विशेष प्रशिक्षण घेत आहेत.

त्यातील काही जणांना ऑलिपिंकसाठीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ६ लाख शिष्यवृत्त्या त्यासाठी दिल्या जात आहेत. १२५ खेळाडू आशियायी स्पर्धेत सहभागी झाले आणि त्यांनी पदके जिंकली, असे मोदी म्‍हणाले.

प्रत्‍येक क्षेत्रात देश विकसित होत आहे आणि त्याच्या केंद्रस्थानी युवक आहे. त्याच्यासाठी ‘माझा भारत’ म्हणजे मी म्हणजेच भारत ही मोहीम

मोदी बोलले अर्धा तास

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ठिक पावणेसात वाजता फातोर्डा स्टेडियमवर आगमन झाले. त्यांचे भाषण पावणेआठला सुरू झाले. सुमारे अर्धा तास पंतप्रधान बोलले. आवाज इको होत असल्याने लोकांना ते स्पष्टपणे ऐकू येत नव्हते, तरीही लोक कानात प्राण आणून त्यांचे शब्द ऐकत होते.

1 नोव्हेंबरपासून सुरू करत आहे. या मंचावर सर्व युवा एकमेकांशी आणि सरकारशी जोडले जातील. त्यांच्यासाठीच्या योजना त्यांना या मंचाच्या माध्यमातून मिळतील. विकसित भारताची ही शक्ती आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Merces: ..मध्यरात्री मडगावकडे जाणारी बस पेटली! मेरशी सर्कलजवळ घडली थरारक घटना; पर्यटकांची जीव वाचविण्यासाठी धडपड

Assagao Raid: आसगावात 7.30 लाखांचा गांजा जप्‍त; जम्मू काश्मीरच्या व्यक्तीला अटक; सात लाखांची रोकड जप्त

Rashi Bhavishya 04 August 2025: मान-सन्मान मिळू शकतो, वरिष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल; करिअरमध्ये सुधारणा

गोवा आणि सिंधुदुर्ग संबंध अधिक दृढ होणार, तवडकरांनी घेतली नारायण राणेंची भेट; विकासावर केली चर्चा!

"घे रे पातोळ्यो खाया सगळेजाण" मुख्यमंत्र्यांना 'खाऊचा डब्बा' देणाऱ्या चिमुकलीचा Video Viral

SCROLL FOR NEXT