Goa G-20 Summit Dainik Gomantak
गोवा

Goa G-20 Summit: जी-२० पर्यटन मंत्र्यांच्या बैठकीत आभासी पद्धतीने पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन

पर्यटनात सामाजिक एकोप्याची ताकद; यावेळी 13 देशातील पर्यटन मंत्री उपस्थित

गोमन्तक डिजिटल टीम

Goa G-20 Summit: दहशतवाद हा देश, धर्मात फूट पाडतो पण पर्यटन त्यांना एकत्र करतो. पर्यटनात सामाजिक एकोप्याची ताकद आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

गोव्यात आयोजित जी 20 पर्यटन मंत्र्यांच्या बैठकीला मोदी यांनी आभासी पद्धतीने मार्गदर्शन केले. यावेळी 13 देशातील पर्यटन मंत्री उपस्थित होते.

संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संस्थेच्या (यूएनडब्ल्यूटीओ) भागीदारीत जी 20 पर्यटन डॅशबोर्ड विकसित केले जात आहे.

हे डॅशबोर्ड सर्वोत्तम पद्धतीचे, तपशीलवार अभ्यास आणि प्रेरणादायी असे पहिले व्यासपीठ असेल, असेही मोदी यांनी यावेळी सांगितले.

मोदी म्हणाले की, भारताचा पर्यटनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा ‘अतिथी देवो भवः’ वर आधारित आहे,  याचा  अर्थ ‘अतिथी म्हणजे देवाचे रूप’ असा आहे.

पर्यटन क्षेत्रासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करताना भारताचे प्रयत्न समृद्ध वारसा जतन करण्यावर केंद्रित आहे.

भारत जगातील प्रत्येक प्रमुख धर्माच्या यात्रेकरूंना आकर्षित करतो. वाराणसी हे प्राचीन काळापासून प्रमुख आध्यात्मिक केंद्रांपैकी एक आहे.

या शहरात पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्यामुळे यात्रेकरूंच्या संख्येत दहा पटीने वाढ झाली आहे.

आजघडीला त्यांची संख्या 7 कोटी झाली आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी यातीलच एक आहे. हा जगातील सर्वात उंच पुतळा असून अनावरण झाल्यानंतर एका वर्षातच सुमारे 2.7 दशलक्ष पर्यटकांलनी या स्थळाला भेट दिल्याचे मोदी म्हणाले.

रोडमॅपमुळे चालना

पर्यटनाच्या परिवर्तनीय शक्तीची जाणीव होण्यासाठीच्या सामूहिक प्रयत्नांना विचारविमर्श आणि ‘गोवा रोडमॅप’मुळे चालना मिळेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. "भारताच्या जी 20 अध्यक्षतेचे ब्रीदवाक्य, ''वसुधैव कुटुंबकम्''-''एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य'' हे जागतिक पर्यटनाचे ब्रीदवाक्य होऊ शकते," असेही मोदींनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT