Goa Congress : गोव्याला दुसरे मणिपूर बनवू देणार नाही; काँग्रेस नेत्या रिचा भार्गव

भाजपा सरकार हे धार्मिक समुदायांमध्ये दंगली, मारामारी असे मुद्दे उपस्थित करून लक्ष वळविण्याचा प्रयत्न करत आहे
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress : कळंगुट पंचायतीजवळ शिवरायांच्या पुतळ्यावरून झालेल्या घटनेचा निषेध करत काँग्रेस पक्षाने भाजपा सरकारवर टीका केली. सत्ताधाऱ्यांना गोव्याची शांती-सलोखा बिघडवायचा असून ते हेतुपुरस्सर समाजात तेढ निर्माण करीत आहेत, असा आरोप काँग्रेस पक्षाच्या नेत्या रिचा भार्गव यांनी करीत काँग्रेस गोव्याला दुसरे मणिपूर बनवू देणार नाही, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.

मणिपूर राज्यात गेल्या दीड महिन्यांपासून हिंसाचार सुरू असून तो नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला अद्याप यश आलेले नाही.

बुधवारी, म्हापशात काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी सरचिटणीस विजय भिके, विश्वास नागवेकर, देवसुरभि यदुवंशी, रोनाल्डो रोझारियो, रायन लोबो, प्रदीप हरमलकर, प्रमेश मयेकर हे उपस्थित होते.

रिचा भार्गव पुढे म्हणाल्या, भाजपा सरकार हे जाणीवपूर्वक लोकसभा निवडणूक जवळ पोचल्याने अशा प्रकारे लोकांमध्ये तेढ निर्माण करून राज्याची शांतता भंग करू पाहते. कारण, सरकारला विकासकामे साधण्यास अपयश आले असून हा मुद्दा वळविण्यासाठी असे कृत्य केले जात आहे. याचेच उदाहरण कळंगुटमधील घटना आहे, अशी टीका त्यांनी केली.

Goa Congress
PM Modi Special Gifts: 7.5 कॅरेटचा हिरवा हिरा! PM मोदींनी बायडन, फर्स्ट लेडीला गिफ्ट केल्या 'या' वस्तू, पाहा व्हिडिओ

मुळात लोकहितार्थ प्रश्नांकडे लक्ष केंद्रीय करण्याऐवजी भाजपा सरकार हे धार्मिक समुदायांमध्ये दंगली, मारामारी असे मुद्दे उपस्थित करून लक्ष वळविण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस पक्ष हा देशात पदयात्रा काढून भारत जोडोचा नारा देते, तर दुसरीकडे भाजपा सरकार देशात व लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप भार्गवा यांनी करीत काँग्रेस गोव्याला दुसरे मणिपूर बनू देणार नाही, असा इशारा भाजपा सरकारला दिला.

विजय भिके म्हणाले, निवडणुकीच्या वेळी कळंगुट यासारख्या घटना भाजपा सरकार जाणीवपूर्वक घडवू पाहते. अशावेळी लोकांना एकोपा राखण्याचे आवाहन त्यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com