postal votes for goa election 2022 Dainik Gomantak
गोवा

टपाल मतांसाठी पोलिस उपनिरीक्षकाकडून दबाव

काँग्रेसने केली तक्रार: संबंधितांना निलंबित करण्याची सुनील कवठणकर यांची मागणी

दैनिक गोमन्तक

पणजी: पोलिस खात्यातील निवडणूक कक्षाचा उपनिरीक्षक ऋषिकेश पाटील हा पोलिसांना टपाल मते भाजपलाच द्यावीत यासाठी दबाव आणत असल्याची तक्रार प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सुनील कवठणकर यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे आज दाखल केली आहे. त्याला सेवेतून त्वरित निलंबित करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी केली आहे. (Pressure from Sub-Inspector of Police for postal votes for goa election 2022)

भाजपलाच (Goa BJP) मतदान करावे असा दबाव हा उपनिरीक्षक आणत असल्याच्या तक्रार काँग्रेसकडे काही पोलिस कर्मचाऱ्यांनी (Goa Police) केल्या आहेत. हा उपनिरीक्षक अनेक पोलिसांशी गेल्या काही दिवसांपासून संपर्क साधत आहे. या कर्मचाऱ्यांना आपल्या समक्ष भाजपला मतदान करण्यास सांगत आहे. हा प्रकार गंभीर स्वरूपाचा आहे. यापूर्वीच काँग्रेसने (Goa Congress) हे प्रकार भाजपकडून सुरू असल्याचे उघड करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची गंभीर दखल मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घ्यावी व योग्य ती कारवाई करावी. पारदर्शक व मुक्त वातावरणात निवडणूक प्रक्रियेचे

उल्लंघन असून ऋषिकेश पाटील यांचा हा प्रकार आचारसंहितेचे भंग करणारा आहे. उपनिरीक्षकाला सेवेतून निलंबित करून कर्मचाऱ्यांवर

आणण्यात येत असलेला दबाव दूर करावा अशी मागणी कवठणकर यांनी केलेल्या तक्रारीत केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: कासवाडा- तळावली येथे घरावर कोसळले वडाचे झाड

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

Shani Budh Vakri: शनि-बुध ग्रहांचा राशीबदल 'या' तीन राशींसाठी भाग्यकारक; धनलाभ ते प्रेमविवाहापर्यंत संधींचे दार उघडणार

Goa Ranji: नवीन मोसम, नवीन प्रशिक्षक! 'गोवा क्रिकेट'ची परंपरा सुरुच; बडोद्याचे 'मेवाडा' सहावे कोच नियुक्त

SCROLL FOR NEXT