Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Statehood Day: राष्ट्रपती, गृहमंत्री यांच्यासह देशभरातून गोव्याला दिल्या घटक राज्य दिनाच्या शुभेच्छा

Goa Statehood Day: "गोवा राज्याची भरभराट होत राहो आणि विकसित भारताच्या निर्मितीत योगदान देत राहो," अशा शुभेच्छा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी दिल्या आहेत.

Pramod Yadav

पणजी: गोव्यात आज ३९ वा घटक राज्य दिन साजरा केला जात आहे. आजच्याच दिवशी १९८७ रोजी गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाला होता. घटक राज्य दिनाच्या निमित्ताने देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विविध नेते आणि मंत्र्यांनी घटक राज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीयांना घटक राज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "आज, आपण गोवा हे भारतीय संघराज्याचे २५ वे राज्य बनले त्या ऐतिहासिक क्षणाचा उत्सव साजरा करत आहोत. ही भूमी वैविध्यपूर्ण संस्कृती आणि उत्थानशील भावनेसाठी ओळखली जाते आणि आता ती प्रगतीशील दृष्टिकोनाने बळकट झालीय."

"येणाऱ्या पिढ्यांसाठी एक मजबूत, स्वयंपूर्ण आणि विकसित गोवा निर्माण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेची आपण प्रयत्न करूया," अशा शब्दात मुख्यमंत्री सावंत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

"गोव्याच्या नागरिकांना राज्य स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! गोव्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, सुंदर समुद्रकिनारे, आदरातिथ्य आणि इतर अनेक आकर्षणे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करत आहेत. पर्यटक आणि रहिवाशांनी शाश्वत पर्यटन पद्धतींचा अवलंब करून आणि स्थानिक समुदायांना पाठिंबा देऊन गोव्याची संस्कृती आणि वारसा जपण्यासाठी एकत्र यावे. गोवा राज्याची भरभराट होत राहो आणि विकसित भारताच्या निर्मितीत योगदान देत राहो," अशा शुभेच्छा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी दिल्या आहेत.

"चैतन्यशील संस्कृती आणि वारसा यामुळे समृद्ध असलेल्या गोव्याने देशाच्या विकासात मोठे योगदान दिले आहे, जागतिक पर्यटन स्थळ म्हणून गोवा उदयास आलाय," अशा शुभेच्छा गृहमंत्री अमित शहांनी दिल्या आहेत.

यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तसेच, गोव्यातील नेते विजय सरदेसाई, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी घटक राज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

काश्मीरनंतर 'द बंगाल फाइल्स'वरुन वाद; ट्रेलर लाँचवेळी कोलकातामध्ये गोंधळ, अग्निहोत्री म्हणाले, 'हुकूमशाही चालणार नाही'

Rain Dogs Exhibition: गोव्यात रविवारी 'रेन डॉग्स' प्रदर्शनाचं आयोजन, छायाचित्रांतून पाहता येणार 'भटक्या कुत्र्यांचे' वास्तव

Horoscope: कृष्ण जन्माष्टमीला गजकेसरी योग! 'या' 3 राशींना नशिबाची साथ; मिळेल आर्थिक लाभ

Goa Live Updates: सावर्डे पंचायतीची प्रलंबीत इमारत,कर्मचारी कमतरता दूर करणार

Irfan Pathan and Shahid Afridi Fight: 'आफ्रिदीने कुत्र्याचं मांस खाल्लं...', फ्लाइटमध्ये झालेल्या वादाबद्दल इरफान पठाणने केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT