President Droupadi Murmu, CM Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

President Droupadi Murmu Goa Visit: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे गुरुवारी गोव्यात आगमन झाल्यानंतर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो आणि इतरांनी त्यांचे आयएनएस हंसा नौदल तळावर स्वागत केले.

गोमन्तक डिजिटल टीम

President Droupadi Murmu Goa Visit

पणजी: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी लष्करी गणवेशात विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेवर जात नौदलाचे सामर्थ्य पाहिले. राष्ट्रपतींसाठी गोव्यालगतच्या खोल समुद्रात नौदलाच्या पश्चिम ताफ्याने कवायतींचे आयोजन केले होते.

या कवायतीत १५ प्रमुख युद्धनौका आणि पाणबुड्या सहभागी झाल्या होत्या. विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेवर राष्ट्रपतींची ही पहिली भेट होती. यावेळी नौदलप्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठी होते. भारतीय सेनादलांच्या सर्वोच्च कमांडर असलेल्या राष्ट्रपतींना यावेळी यावेळी नौदलाचे कार्य आणि कार्यपद्धतीची माहिती देण्यात आली. राष्ट्रपतींनी विविध नौदल कार्याचा अनुभव घेतला.

हंसा नौदल तळावर स्वागत

दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे गुरुवारी गोव्यात आगमन झाल्यानंतर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, शिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो आणि इतरांनी त्यांचे आयएनएस हंसा नौदल तळावर जोरदार स्वागत केले. नौदलाच्या स्वागत पथकाने राष्ट्रपतींना मानवंदना दिली. यावेळी दक्षिण गोवा लोकसभा खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, मुख्य सचिव डॉ. व्ही. कादावेलू, नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी एग्ना क्लीटस आदींची उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT