President Murmu Goa Visit Dainik Gomantak
गोवा

भाषणाची सुरूवात आणि शेवट कोकणीत, राष्ट्रपती गोव्यातील नागरी सत्कारानंतर काय बोलल्या?

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा राजभवनात नागरी सत्कार करण्यात आला.

Pramod Yadav

President Droupadi Murmu Goa Visit: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गोव्यातील समान नागरी कायद्याचे कौतुक करत, राज्यात विविध क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

राष्ट्रपती मुर्मू या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी गोव्यात आल्या आहेत. राजभवनात आज त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या हस्ते निवडक लाभार्थ्यांना वन हक्क कायद्यांतर्गत सनद वाटप करण्यात आले. त्यानंतर त्या सत्काराला उत्तर देताना बोलत होत्या.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गोव्यातील त्यांच्या भाषणाची सुरूवात कोकणीत केली. तुम्हा सगळ्यांना प्रेमाचा नमस्कार असे कोकणीत म्हणत मुर्मू यांनी त्यांच्या सत्काराबद्दल सर्वांचे आभार मानले.

गोव्यात सर्वांत समृद्ध वनक्षेत्र असल्याचा त्यांनी भाषणात उल्लेख केला. 18 जून क्रांती दिवसाच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी डॉ. राममनोहर लोहीया यांचे योगदाने स्मरण केले. गोव्यात विविध क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

राष्ट्रपती मुर्मू यांनी राज्यातील समान नागरी कायद्याचे कौतुक केले. गोव्यातील लोक उत्सवप्रेमी असून, येथील आदारतिथ्य उत्तम असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यातील लोक देश विदेशात उत्तम कामगिरी करत आहेत. राज्य पर्यटनसोडता उतर क्षेत्रात देखील चांगले काम करत असून, गोव्याच्या सर्वांगिण विकासासाठी शुभेच्छा देते. असे राष्ट्रपती म्हणाल्या

मनोहर पर्रीकरांच्या योगदानाचे कौतुक करत त्यांनी मोपा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या विमानतळाचे नाव देखील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे देण्यात आल्याचा उल्लेख केला.

याशिवाय मुर्मू यांनी राज्यातील कलाकार, खेळाडू आणि पारंपरिक व्यावसायिक यांचे देखील कौतुक केले. त्यांनी भाषणाचा शेवट देखील कोकणीत केला. देव बरें करू असे म्हणत त्यांनी भाषण संपवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT