President Droupadi Murmu Goa Assembly Address  Goa Assembly
गोवा

President Murmu Goa Assembly Speech: 'गोव्यासाठी ही चिंतेची बाब', राष्ट्रपतींनी आमदारांना काय दिला विशेष सल्ला?

गोवा विधानसभेच्या कामाकाजाचे थेट प्रेक्षेपण केले जाते, यामुळे राज्यातील सामान्य लोकांना त्यांचे लोक प्रतिनिधी कसे वागतात हे पाहायला मिळते.

Pramod Yadav

President Droupadi Murmu Goa Assembly Speech: "राज्यातील महिलांच्या कार्यशक्तीबाबत चिंता करण्याची गरज आहे. विधानसभेत देखील महिलांचे प्रतिनिधित्व कमी दिसतेय. गोव्यासारख्या राज्यासाठी ही चांगली बाब नाही." अशा शब्दात मुर्मू यांनी चिंता व्यक्त केली. ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्वांना प्रयत्न करायला हवेत. अशी सूचनाही त्यांनी केली.

राष्ट्रपती गोवा विधानसभेत आमदरांना संबोधित करत होत्या त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.

President Droupadi Murmu Goa Assembly Address

"तुम्हा सर्वांना या सभागृहाचे सदस्य झाल्याबद्दल शुभेच्छा देते. तुम्ही जनतेचे सेवक आहात, विविध धर्म आणि जातीचे असून देखील सर्व एक गोवा आणि एक भारत या संकल्पनेवर विश्वास ठेवतात. गोव्याच्या मुक्ती शिवाय भारताचे स्वातंत्र्य अपूर्ण होते, याच प्रेरणेने देशातील अनेक क्रांतीकारींनी राज्याच्या मुक्तीसाठी संघर्ष केला." असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.

"टी. बी. कुन्हा, राम मनोहर लोहिया, मधू लिमये, मोहन रानडे, पुरूषोत्तम काकोडकर यासारख्या मुक्तीसाठी संघर्ष केलेल्या स्वातंत्र्यसेननींचा राष्ट्रप्रेम खूप मोठे आहे. विधानसभेचे सदस्य गोव्यातील जनतेच्या आशा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहतील अशी मला आशा आहे." असे मुर्मू म्हणाल्या. यावेळी त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे स्मरण केले.

"राज्यात कोणताही धार्मिक भेदभाव न ठेवता सर्व सण साजरे केले जातात. पर्यटनासाठी गोव्याची सर्व जगात ओळख आहे. यासह लोह, मॅग्निज, बॉक्साईट यासारखे खनिज देखील राज्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत." असे राष्ट्रपती म्हणाल्या.

"राज्यातील महिलांच्या कार्यशक्तीबाबत चिंता करण्याची गरज आहे. विधानसभेत देखील महिलांचे प्रतिनिधित्व कमी दिसतेय. गोव्यासारख्या राज्यासाठी ही चांगली बाब नाही." अशा शब्दात मुर्मू यांनी चिंता व्यक्त केली. ही परिस्थिती बदलण्यासाठी सर्वांना प्रयत्न करायला हवेत. अशी सूचनाही त्यांनी केली.

गोवा विधानसभेच्या कामाकाजाचे थेट प्रेक्षेपण केले जाते, यामुळे राज्यातील सामान्य लोकांना त्यांचे लोक प्रतिनिधी कसे वागतात हे पाहायला मिळते.

गोवा विकासाचे असे मॉडेल निर्माण करावे जे देशातील अन्य राज्यांसाठी एक उदाहरण ठरेल, त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. गोव्यातील नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण करून आणि समुद्र किनाऱ्यांच्या मर्यादा लक्षात घेत कर्मठ गोमन्तकीयांच्या सोबतीने हे लक्ष्य साध्य करतील असा विश्वास राष्ट्रपती मुर्मू यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suleman Khan: कोठडीतून पलायन प्रकरण! कॉन्स्टेबलसहित सुलेमान खानवर आरोप निश्चित

Goa News: ‘त्या’ निवृत्त कर्मचाऱ्याची पेन्शन द्या! फौजदारी खटलाप्रकरणी गोवा खंडपीठाचा आदेश

Goa Crime: गोमंतकीयांना कोट्यवधींचा गंडा घालणारा ठग सापडला, मुंबईत आवळल्या मुसक्या; गुन्हे शाखेला मोठे यश

Mhaje Ghar: गोमंतकीयांना परवडणारे ‘माझे घर’ देणार! CM सावंतांचे आश्वासन; ‘गृहनिर्माण’कडून आराखड्याचे काम सुरू

Goa Education: 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! दहा टक्‍के गुण मिळवणारेही होणार उत्तीर्ण; वाचा संपूर्ण माहिती..

SCROLL FOR NEXT