Rohit Monserrate Mayor of Panaji Sent back from goa assembly: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मंगळवारपासून गोवा दौऱ्यावर आल्या आहेत. मंगळवारी त्यांचा राजभवनात नागरी सत्कार झाल्यानंतर आज (बुधवारी) त्यांनी गोवा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाला हजेरी लावली. मुर्मू विधानसभेतील राज्यातील आमदारांना संबोधित करणार आहेत.
या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी राज्यातील सर्व आमदार उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे पणजी महापौर रोहीत मोन्सेरात देखील राष्ट्रपतींचे भाषण ऐकण्यासाठी आले मात्र त्यांना विधानभवन परिसरातून माघारी जावे लागले.
झाले असे की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू विधानसभेत आमदारांना संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमासाठी राज्यातील सर्व आमदार उपस्थित आहेत. राष्ट्रपतींचे भाषण ऐकण्यासाठी पणजीचे महापौर रोहीत मोन्सेरात देखील विधानभवन परिसरात आले. पण, त्यांच्याकडे कार्यक्रमाचा पास नसल्याने विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच सुरक्षा रक्षकांनी आडवले.
महापौर मोन्सेरात यांच्याकडे पास नसल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. दरम्यान, निराशा झाल्याने मोन्सेरात त्यांच्या समर्थकांसह तेथून माघारी गेले.
गोवा विद्यापीठात पदवीदान समारंभाला हजेरी
विधानसभेत येण्यापूर्वी राष्ट्रपती मुर्मू यांनी गोवा विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाला हजेरी लावली. यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.