Goa Liberation Day 2022 Dainik Gomantak
गोवा

Goa Liberation Day 2022: 'गोल्डन गोवा'; राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांनी गोमन्तकीयांना दिल्या मुक्तिदिनाच्या शुभेच्छा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

Pramod Yadav

पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीच्या बेड्या तोडून सर्व गोमन्तकीयांनी 19 डिसेंबर 1961 रोजी स्वातंत्र्याचा सूर्य पाहिला. 450 वर्षाहून अधिककाळ गोव्यात पोर्तुगीज तळ ठोकून होते. भारतीय लष्काराच्या तुकड्यांनी 36 तासांत गोव्यात पोर्तुगिजांपासून मुक्त केले. ऑपरेशन विजय असे गोव्याला मुक्त करण्यासाठी केलेल्या लष्करी ऑपरेशनचे नाव होते. गोव्याच्या 62 व्या मुक्तिदिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

"सर्व गोमन्तकीयांना मुक्तिदिनाच्या शुभेच्छा. राज्याच्या प्रगतीचा साक्षिदार होणं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपण गोल्डन गोवा या स्वप्नाच्या जवळ जात आहोत. गोवा मुक्तीसाठी बलिदान दिलेल्या आणि लढा दिलेल्या सर्वांना श्रद्धांजली. ऑपरेशन विजयमध्ये सहभागी सर्व शूरवीर भारतीय सैनिकांना सलाम." अशा शब्दात मुख्यमंत्री सावंत यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

"मुक्तिदिनाच्या निमित्त गोव्याच्या जनतेला माझ्याकडून शुभेच्छा. वसाहतवादी राजवटीतून गोवा मुक्तीसाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली. सशस्त्र दलांच्या शौर्याला सलाम. गोव्याच्या जनतेला माझ्या शुभेच्छा." अशा शब्दात देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT