Goa Politics | Adv. Ujjwal Nikam Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: सध्या राजकारणांच्या शब्द कोषातून प्रेम हा शब्द नाहीसा- ॲड. निकम

Goa Politics: आजच्या राजकारणात नीतिमत्ता हा शब्द राहिलेला नाही.

दैनिक गोमन्तक

Goa Politics: आजच्या राजकारणात नीतिमत्ता हा शब्द राहिलेला नाही. त्याबरोबर राजकारणांच्या शब्द कोषातून प्रेम हा शब्द नाहीसा झाला आहे. प्रेमात जस सगळे काही साम्य असते, तसे राजकारणात प्रेम शब्द काढून सगळे काही साम्य आहे, असे मत ज्येष्ठ सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.

म्हापसा येथे कार्यक्रमप्रसंगी अ‍ॅड. निकम उपस्तित होते. यावेळी ‘गोमन्तक’शी बोलताना त्यांनी वरील मत व्यक्त केले. आजच्या राजकारण्यांना न्यायालयात काय घडणार याची कुणकुण पहिल्यांदाच मिळते. सत्ता मिळविण्यासाठी नितीमत्तेला तिलाजंली दिली जाते, असेही निकम म्हणाले.

वकील व पोलिस यांच्यातील कथित संघर्षासंदर्भात अ‍ॅड. उज्जवल निकम म्हणाले, पोलिस, राजकारण्याचा दबाव वाढलेला आहे. मालमत्तेसंदर्भात पोलिस हस्तक्षेप करतात हा प्रश्न उपस्थित करीत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

राज्यात पोलिसांकडून खूनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला. हाच गुन्हा सामान्य माणसांनी केला असता तर लगेच खुनी हल्ला करण्याच्या प्रयत्नाखाली गुन्हा नोंदविला जातो, असे विचारले असता ते म्हणाले, सात वर्षांखालील गुन्हा असेल तर गुन्हा नोंदविण्याची गरज नाही. चौकशीनंतर गुन्हा दाखल करता येतो. आज पोलिस यंत्रणा सुद्धा राजकारण्याच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहेत, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

SCROLL FOR NEXT