Shadow Council Goa: नाताळ सुट्टीचा फायदा घेत विषारी कचरा न्यायालय इमारतीच्या बाजूला; शॅडो कौन्‍सिलकडून निषेध

Shadow Council Goa: मडगावात रात्रीच्या वेळी हे काम सुरु असून कमीत कमी 200 ट्रक कचरा तेथे टाकण्यात आला आहे.
Shadow Council for Margao, Goa
Shadow Council for Margao, GoaDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Shadow Council Goa: नाताळ आणि न्यायालयीन सुट्टीचा फायदा घेत मडगाव नगरपालिकेने सोनसोडो येथील विषारी कचरा जिल्हा न्यायालय इमारतीच्या बाजूला असलेल्या जागेत टाकण्याचे काम सुरू केले आहे. गेले दोन दिवस रात्रीच्या वेळी हे काम सुरू असून कमीत कमी 200 ट्रक कचरा तेथे टाकण्यात आला आहे. शॅडो कौन्सिलने या प्रकाराचा काल मूक निषेध केला.

जेसीबीद्वारे हा कचरा सपाट करण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे. त्‍यानंतर मातीचा भराव घालून हा विषारी कचरा झाकण्याचे काम सुरू होईल. मात्र त्यामुळे जुना बाजार, एसजीपीडीए मार्केट व परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरणार आहे. इशा फाऊंडेशनचे संस्थापक सदगुरु यांच्याकडे हल्लीच राज्य सरकारने ‘माती वाचवा’ मोहिमेबाबत सामंजस्य करार केलेला आहे.

चांगल्या मातीत विषारी कचरा टाकणे हा ‘माती वाचवा’ मोहिमेचा एक भाग आहे का? लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या प्रकरणाकडे डोळेझाक करणारे मडगाव व फातोर्ड्याचे आमदार झोपले आहेत का? असे प्रश्र्न मूक निषेध केलेल्या शॅडो कौन्सिलचे निमंत्रक सावियो कुतिन्हो व इतरांनी उपस्थित केले.

यापूर्वी याच ठिकाणी जी माती टाकली होती, त्याची चाचणी करून कचरा व्यवस्थापन महामंडळाने अहवाल दिला आहे. त्यात मर्कुरीसारखा (पारा) विषारी पदार्थ असल्याचे सिद्ध झाले असतानाही दुसऱ्यांदा हा कचरा टाकणे किती भयानक आहे याची नगरपालिका, सरकार व आमदारांना जाणीव तरी आहे का, असा संतप्‍त सवाल उपस्‍थित करण्‍यात आला. यासंदर्भात न्यायालयात याचिका सादर करण्यात आली असून ठोस पावले उचलण्‍याची विनंती करण्यात आली.

पोल्युशन कंट्रोल बोर्ड की पोल्युशन क्रिएशन बोर्ड?

राज्य सरकारचा पोल्युशन कंट्रोल बोर्ड (प्रदूषण नियंत्रण मंडळ) सध्‍या पोल्युशन क्रिएशन बोर्ड झाल्याची टीका यावेळी करण्यात आली. सरकारने यासंदर्भात जर ठोस पावले उचलली नाहीत म्हणजेच इथे टाकलेला कचरा तात्काळ हलवला नाही तर त्याचे गंभीर परिणाम सरकारलाच भोगावे लागतील, असा इशारा शेडो कौन्सिलने दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa postmen daily wage
Dog walker earns 50000 per day
Margao Stray Dogs Survey
Goa Wooden Ganesh Sculptures
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com