Goa Christmas Celebration

 

Dainik Gomantak 

गोवा

राज्यात ख्रिसमसचा माहोल सजू लागला!

बाजारात गर्दी वाढली, चर्च, घरांतून रंगरंगोटीचे काम सुरू..

दैनिक गोमन्तक

खांडोळा: राज्यात ख्रिसमसचे आगमन अवघ्या आठवड्यावर आले आहे. त्यामुळे घरांची चर्चची रंगरंगोटी केली जाताना पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी सार्वजनिक रस्त्यांवर चांदण्या लावलेल्या दिसून येत आहेत तर काही दुकानांच्या द्वारावर आणि समोर सांताचे चित्र किंवा पुतळा ग्राहकांना बोलविण्यासाठी उभा असलेला पहायला मिळत आहे. एकूणच राज्यात दणक्यात ख्रिसमसच्या सेलिब्रेशनची (Goa Christmas Celebration) तयारी सुरू आहे. देशी-विदेशी पर्यटकांची संख्याही वाढत आहे.

यावर्षी कोरोनाची (Corona) पार्श्वभूमी असूनही ख्रिसमसच्या (Christmas) निमित्ताने राज्यात येण्यासाठी अनेक पर्यटक उत्सुक असल्याचे पहायला मिळते. त्यासाठी किनारी हॉटेल्स सज्ज होऊ लागले आहे. समुद्रकिनारी असणाऱ्या हॉटेलमध्ये पर्यटकांकरवी खोल्या आतापासूनच बुक केल्या जात आहेत. अनेक हॉटेल्स त्यांच्या हॉटेलचे (Hotel) दराचे प्रमोशन सोशल मिडियाच्या माध्यमातून करत असल्याचे पहायला मिळत आहे.

ख्रिसमस साठीच्या सार्वजनिक पार्टी यावर्षी आयोजित होणार कि नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी राज्यात यावर्षीसुद्धा मोठा संख्येत पर्यटक येणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

कोविडचे नवे नवे प्रकार येत असूनही तपासणी नाक्यावर तपासणी केल्यानंतर राज्यात पर्यटक येत आहेत. वर्क फ्रॉम होममुळे दिवसेंदिवस घरात बसून असलेले लोक गोव्यात (Goa) येऊन आपला मूड ताजातवाना करीत आहेत. ते एन्जॉय करताना दिसत आहेत. मात्र या सगळ्या वातावरणात सुरक्षित सामाजिक अंतर आणि मास्क घालण्याबाबतच्या एसओपीचा मात्र फज्जा उडताना दिसून येत आहे. सार्वजनिक ठिकाणी ही पर्यटक मंडळी कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून कोणत्याही प्रकारची काळजी न घेता फिरत असल्याने कोरोनाच्या प्रसार अधिक तर होणार नाही ना, याची भीती स्थानिकांना वाटत आहे.

बाजारात गर्दी

बाजारपेठ खिसमसनाही लागणाऱ्या साहित्याने खुलून निघाल्या आहेत. बाजारपेठांमध्ये ख्रिसमस ट्री, सांताच्या टोप्या, स्नोबॉल आणि इतर सजावटीचे सामान मोठ्या प्रमाणात आले आहे. हे सामान खरेदी करण्यासाठी लोकांची सायंकाळच्या वेळी बाजारपेठेत गर्दी जॅम होत असलेली पाहायला मिळत आहे. घराघरांमध्ये ख्रिसमस पार्टीच्या गिफ्टसाठीचीसुद्धा तयारी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cristiano Ronaldo: रोनाल्डो 'गोव्यात' खेळणार की नाही? सुरक्षा यंत्रणा घेणार निर्णय; देशभरातील फुटबॉलप्रेमी आशावादी

Goa AAP: 'गोव्यात काँग्रेसने जनतेचा विश्‍वास गमावला'! आतिषी यांचे प्रतिपादन; आघाडी करणार नसल्याचा पुनरुच्चार

Goa Politics: खरी कुजबुज; फोंड्यात अशीही बनवाबनवी

Goa Cabinet: चतुर्थीपूर्वी मंत्रिमंडळात होऊ शकतो बदल; दामू नाईकांचा संकेत; मुख्‍यमंत्र्यांकडून ‘सस्‍पेन्‍स’ कायम

Coconut Price Goa: 45 रुपयांचा नारळ स्वस्त कसा? विजय सरदेसाईंचा सवाल

SCROLL FOR NEXT