घाई नरकासुर प्रतिमा बनवण्याची  Dainik Gomantak
गोवा

वास्‍कोत नरकासुराची प्रतिमा बनवण्याची लगबग

दिवाळीला अवघे काही दिवस राहिल्याने रविवारी सुट्टीच्या दिवशी युवक नरकासुराच्या (Narkasur) प्रतिमा बनविण्यात गुंतल्याचे दिसून आले.

दैनिक गोमन्तक

दाबोळी: वास्‍कोत सध्‍या नरकासुर प्रतिमा बनविण्याची लगबग सुरू झाली आहे. दिवाळीला अवघे काही दिवस राहिल्याने रविवारी सुट्टीच्या दिवशी युवक नरकासुराच्या (Narkasur) प्रतिमा बनविण्यात गुंतल्याचे दिसून आले. यामध्ये लहान मुलांचाही सहभाग होता. लोखंडी सळ्यांचा साचा व लाकडी साहित्याचा वापर करून तयार केलेले नरकासुराचे सांगाडे ठिकठिकाणी रस्त्यानजीक उभारलेले दिसत आहेत.

अद्याप मुलांची परीक्षा संपलेली नसल्याने त्‍यांची उपस्‍थिती सध्‍या कमी दिसत आहे. तरीही रविवारी सुट्टीच्‍या दिवशी मुले नरकासुर प्रतिमा बनवताना दिसत होती. वास्को, बायणा, मांगूरहिल, सडा, नवेवाडे, दाबोळी आदी भागांत नरकासुर प्रतिमा बनवण्‍याचे काम जोमाने सुरू आहे. नरकासुराचा मातीचा मुखवटा तयार केला जात आहे. मातीपासून मुखवटे तयार करून त्यांना कागद चिकटवला जातो. त्‍यानंतर तो वाळायला ठेवला जातो. वाळल्‍यानंतर त्याला रंग दिला जाईल, असे या युवकांनी सांगितले. नरकासुर प्रतिमा तयार करण्यासाठी प्लॅस्टिकऐवजी गवत आणि कागदाचा वापर केला जात आहे. त्‍यातून पर्यावरणाचे भान राखले जात असल्याचे दिसत आहे.

आकाशकंदील बनवण्‍यास आलाय वेग

दिवाळीत आकाशकंदील हे देखील आकर्षण असते. काहीजण आकाशकंदील बाजारातून विकत आणतात, तर काहीजण एकत्र येऊन छोटाच का होईना पण आकाशकंदील बनवतात. दिवाळीनिमित्त होणाऱ्या आकाशकंदील स्पर्धेसाठी काहीजणांकडून तयारी सुरू आहे. त्यासाठी आवश्यक कागद, माडांच्या झावळ्या, आईस्क्रीमचे चमचे, रंगीत कागद, दोरी, बाटलीचे झाकण आदी साहित्य जमविण्यास सुरुवात झाली आहे.

मोठ्या स्‍पर्धांबाबत अजूनही साशंकता

यंदा वास्कोत मोठ्या पातळीवरील नरकासुर स्पर्धा होणार की नाही याबाबत साशंकता असली, तरी वाड्यावाड्यावर नरकासूर प्रतिमा तयार करण्याचे काम सुरूच आहे. वास्कोत लहान स्पर्धा होणार असून, त्याविषयीचे फलकही झळकले आहेत. तसेच आगामी विधानसभा निवडणूक जवळ आल्‍याने स्‍पर्धांच्‍या माध्‍यमातून प्रचाराची संधी उमेदवार साधतील, अशी शक्‍यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Elections: 'कमळ' फुलवण्यासाठी 'त्रिसूत्री' रणनीती! मित्रपक्ष मगोसह अपक्षांनाही संधी; मुख्यमंत्र्यांना विजयाची खात्री

Goa Politics: 'नियमांचे पालन न केल्यास पोलीस कारवाई करणारच', सरदेसाईंच्या सभेवरील कारवाईवर रमेश तवडकरांचा सणसणीत टोला

Renuka Chowdhury: 'चावणारे तर संसदेत बसलेत...' काँग्रेस खासदार रेणुका चौधरींची पाळीव कुत्र्यासोबत एन्ट्री Watch Video

Samantha Ruth Prabhu: चर्चांना पूर्णविराम! समंथाने बांधली लग्नगाठ, नवऱ्यासोबतचा पहिला Photo Viral

Goa Live News:गोवा पोलिसांत निरीक्षकांच्या बदल्या; वाळपईचे शिराडकर कोलव्यात, तर कोलव्याचे नाईक वाळपईत

SCROLL FOR NEXT