Premanand Nanoskar joins Aam Aadmi Party from Dabolim constituency Dainik Gomantak
गोवा

प्रेमानंद नानोस्कर यांनी आपमध्ये प्रवेश करताच राजकीय वातावरणात बदल

नानोस्कर आप मध्ये येताच त्यांना दाबोळीतून वाढता प्रतिसाद लाभत आहे

दैनिक गोमन्तक

दाबोळी: दाबोळी (Dabolim) मतदार संघातून प्रेमानंद (बाबू) नानोस्कर याने आम आदमी पक्षात (AAP) प्रवेश करताच येथील राजकीय वातावरणात (Goa Politics) बदल झाला आहे. नानोस्कर आप मध्ये येताच त्यांना दाबोळीतून वाढता प्रतिसाद लाभत आहे. सध्या नानोस्कर याने नवेवाडे, वाडे, दाबोळी, चिखली,बोगमाळोत जनसंपर्क वाढवण्यास भर दिल्याने दाबोळीत यंदा राजकारणात बदल होण्याची चिन्हे राजकीय वर्तुळातून बोलण्यात येत आहे.

मुरगाव तालुक्यातील दाबोळी मतदार संघातून गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत प्रेमानंद (बाबू) नानोस्कर याने बर्‍यापैकी मजल मारली होती. यंदा बाबू नानोस्कर यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केल्याने कदाचित दाबोळीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून बोलण्यात येत आहे. दिल्लीत आम आदमी पक्षाने सामान्य जनतेला अनेक योजना पुरवल्या असून कदाचित गोव्यात आप बऱ्यापैकी योजना देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात बोलण्यात येत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे कुशल नेतृत्व गोव्यातील राजकारणात बदल घडवण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. यामुळे गोव्यातील राजकारणात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आप महत्त्वाची भूमिका बजावणार अशी चर्चा राजकीय क्षेत्रातून येत आहे.

दाबोळीतून प्रेमानंद नानोस्कर यांनी आम आदमी पक्षात प्रवेश करताच दाबोळीतील राजकारण तापू लागले आहे. कदाचित नानोस्कर यांना यंदा आप मुळे बऱ्यापैकी विधानसभा निवडणुकीत यश प्राप्त येऊ शकते अशीही चर्चा दाबोळी बरोबर मुरगाव तालुक्यातून बोलण्यात येत आहे. दाबोळी आपने दोन प्रचार कार्यालय खुली केल्याने येथे सामान्य जनतेला न्याय मिळण्याची आशा जागी झाली आहे. नानोस्कर यांचे कार्य मुरगाव नगरपालिके बरोबर चिखली व चिकोलणा- बोगमाळो पंचायत क्षेत्रात पर्यंत पोहचलेले आहे. यामुळे दाबोळीचे राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa: पावसासाठी देवाला हाक! मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत, बोडगेश्वर मंदिरात विशेष प्रार्थना

Honda Panchayat: 32 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली पंचायत इमारत पाडण्याचा आदेश, सोमवारपासून कार्यवाही; होंड्यात नवे संकुल बांधले जाणार

VIDEO: 10 चौकार, 8 षटकार, 324 चा स्ट्राईक रेट... वैभव सूर्यवंशीनं 29 चेंडूत कुटल्या 94 धावा!युवराज सिंहचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला!

Panaji Smart City: स्मार्ट सिटीच्या बसथांब्यांवर प्रश्नचिन्ह, रचना बदलाच्या वादात काम अर्धवट; पावसाळ्यात प्रवाशांची गैरसोय

NEET Exam: गोव्यात 12 केंद्रांवर 'नीट'साठी कडक देखरेख; सर्व यंत्रणा सज्ज, मुख्यमंत्री प्रमोद सावंतांची माहिती

SCROLL FOR NEXT