मडगाव शहरातील गटारांमध्ये साचलेला पालापाचोळा. Dainik Gomantak
गोवा

मडगावात सोमवारपासून सुरू होणार मॉन्सूनपूर्व कामे

अगोदर ही कामे चार कंत्राटदारांना देण्याचे ठरले होते.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: पावसाळा तोंडावर आला असल्याने मडगाव पालिकेतर्फे सोमवारी (ता. 16) मॉन्सूनपूर्व कामांना सुरवात करण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष लिंडन परेरा यांनी दिली. मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून तात्पुरता ताबा स्वीकारलेले अतिरिक्त जिल्हाधिकारी सुरेंद्र नाईक यांनी सांगितले की, पावसाळापूर्व कामासंबंधी फाईल आपण क्लिअर केली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यापासून ही कामे सुरू होतील.

हल्लीच झालेल्या पालिकेच्या बैठकीत पावसाळापूर्व कामावरून खडाजंगी झाली होती. अगोदर ही कामे चार कंत्राटदारांना देण्याचे ठरले होते. पण, केवळ दोन कंत्राटदारांना निविदा भरल्याने हे काम योग्य वेळेत पूर्ण होतील की नाही या बद्दल साशंकता निर्माण झाली आहे. नगरपालिका प्रशासन खात्यानेही या संदर्भातील फाईली क्लिअर केल्या आहेत. जर पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण झाली नाहीत तर संपूर्ण मडगाव शहर पाण्याखाली येण्याची शक्यता आहे. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या खळ्यांमध्ये पानापाचोळा साठलेला आहे, तो तेथून काढणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Refinery Attack: शस्त्रसंधीला अवघ्या काही तासांतच 'सुरुंग'! इराणच्या लावन बेटावरील तेल रिफायनरीवर हल्ला; कुवेत आणि यूएईवरही पलटवार

Iran US War Ceasefire: "इराणमध्ये सत्तापालट होणार!" ट्रम्प यांचा मोठा दावा; शस्त्रसंधीनंतर अमेरिकेची अण्वस्त्र तळांवर नजर

Mapusa Raid: म्हापशात मध्यरात्री थरार! ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा घाला, 24 वर्षीय विजय सिंगला रंगेहाथ पकडलं; दोन अल्पवयीन मुलही ताब्यात

Ponda By Election: फोंडा पोटनिवडणूक रद्द, उच्च न्यायालयाचा मोठा निकाल! निवडणूक अधिसूचना ठरवली रद्दबातल

US Iran War Timeline: सुप्रीम लीडरचा अंत, 4000 मृत्यू अन् 90 हजार घरांची राखरांगोळी! अमेरिका-इराण युद्धाच्या टाइमलाइनचा थरारक पट; 40 दिवसांनी रक्तरंजित संघर्षाला ब्रेक

SCROLL FOR NEXT