Mapusa  Dainik Gomantak
गोवा

Mapusa News : म्हापशात माॅन्सूनपूर्व कामे रखडली; रहिवाशी त्रस्त

Mapusa News : खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुर्दशा,नगरसेवक,वाहनचालकांतही संताप

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa News :

बार्देश, म्हापसा नगरपालिका क्षेत्रामध्ये वाढलेली धोकादायक झाडे लवकर हटवावीत, भूमिगत वीज वाहिनीचे काम करताना रस्त्यावर पडलेले खड्डे पावसाळ्यापूर्वी बुजवावेत, गटारांची व नाल्यांची साफसफाई करावी, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.

शिवाय वाहन चालकांकडून तसेच काही नगरसेवकांकडूनही होत आहे. म्हापसा नगरपालिकेमध्ये वीस प्रभाग येतात. या सर्व प्रभागांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यालगत झाडे वाढलेली आहेत. काही गटाऱ्यांची साफसफाई तसेच नाल्यांची साफसफाई अजून पर्यंत करण्यात आलेली नाही.

त्याचप्रमाणे भूमिगत वीजवाहिनी घालताना खोदकाम केल्याने ठिकठिकाणी रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. त्या रस्त्यांचे काम करावे, अशी मागणी रहिवाशांकडून व वाहक चालकांकडून करण्यात येत आहे.

काही नगरसेवकांची प्रतिक्रिया आहे की, काही प्रभागामधल्या रस्ते भूमिगत वीज वाहिन्या घालते वेळी खोदून ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे त्या त्या प्रभागांमधल्या लोकांना त्रास होतो. अजूनही धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे नगरसेवक या नात्याने आम्हाला लोकांकडून विचारणा केली जात असल्याचेही काही नगरसेवकांनी सांगितले.

माॅन्सूनपूर्व कामांकडे पालिकेचे दुर्लक्ष!

म्हापसा नगरपालिका क्षेत्रातील गटारांची, रस्त्यांची दुर्दशा व रस्त्यांलगत वाढलेली झाडे न कापल्याने पावसाळ्यात लोकांना व वाहनचालकांना त्रास सोसावा लागणार आहे. याची माहिती असूनही म्हापसा पालिकेने एप्रिल महिन्यापासूनच येथील गटारांची साफसफाई, रस्त्यांची दुरुस्ती करण्याकडे काणाडोळा केला आहे.

जून महिना सुरू झाला तरी या समस्यांकडे त्यांनी लक्ष दिलेले नाही. त्यामुळे यंदाही दरवर्षीप्रमाणे जागोजागी पाणी साठून रस्त्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त होणार आहे व गटारातील पाणी रस्त्यावर येणार, हे स्पष्ट होत आहे,असा संताप सामाजिक कार्यकर्ते सचिन किटलेकर यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

MS Dhoni Jersey Number 7: थालाचा नवा अवतार! 7 नंबरची जर्सी बदलून धोनी रचणार नवा इतिहास? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Zodiac Personality Traits: गप्प बसतात पण सगळा हिशोब ठेवतात! 'या' 6 राशींचे लोक चालते-फिरते डिटेक्टिव्ह; चुटकीसरशी ओळखतात शत्रूचा डाव

Iran Israel War: मृत्यूच्या दाव्यानंतर काही क्षणातचं इराणच्या सर्वोच्च सुरक्षा प्रमुखाचं ट्विट! इस्रायलचा दावा खोटा की तेहरानचा 'माइंड गेम'?

VIDEO: 'लाईफ इज ब्युटीफुल इन गोवा!' हरमनप्रीत कौर अन् पेलेचा व्हिडिओ व्हायरल; किनाऱ्यावर रंगली गप्पांची मैफल

Pilgao: सफर गोव्याची! म्हादई समुद्राला मिळण्यापूर्वी लागणारे, छोटेसे टुमदार 'पिळगाव'

SCROLL FOR NEXT