Cuncolim Rain Dainik Gomantak
गोवा

Cuncolim: रस्ते बुडले, घरांतही शिरले पाणी; कुंकळ्ळीत पूरसदृश स्थिती

Cuncolim Rain: कुंकळ्ळी औद्योगिक वसाहती जवळ कोकण रेल्वे अंडरपास पाण्याखाली आल्याने वाहन चालकांना बरेच त्रास सहन करावे लागले.

Sameer Panditrao

कुंकळ्ळी: मान्सूनपूर्व पावसामुळे कुंकळ्ळी पालिका क्षेत्रातील सर्व प्रभागांत पाणी साचल्याने लोकांची तारांबळ उडाली. भिवसा, गोठण, कोंबा पारिकोटो, केगदीकटा, वेरोडा, तलवाडा, कुंकळ्ळी औद्योगिक वसाहत व इतर भागात पाणी साचल्याने रस्ते पाण्याखाली आले.

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहती जवळ कोकण रेल्वे अंडरपास पाण्याखाली आल्याने वाहन चालकांना बरेच त्रास सहन करावे लागले. कोंबा पारिकोटो येथे पाण्याचा निचरा न झाल्याने पूर्ण रस्ता पाण्याखाली आला होता. काही घरात ही पाणी गेल्याने लोकांची तारांबळ उडाली.

पालिकेने मान्सून पूर्व कामे हाती न घेतल्यामुळे व गटाराची साफसफाई न केल्यामुळे पाण्याचा निचरा योग्य प्रकारे झाला नाही. त्यामुळे सर्वत्र पूरसदृश स्थिती होती.

दरम्यान, सरकारी आदेशाची पायमल्ली करून भरपावसात आकामळ ते आंबावलीपर्यंत रस्ता खोदण्याचे चालू आहे. या संदर्भात दै. गोमन्तकमध्ये बातमी प्रकाशित झाल्यावर दुसऱ्या दिवशी कुंकळ्ळी पोलिसांनी दखल घेत रस्ता खोदण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रे बंद ठेवण्याचा आदेश कंत्राटदाराला दिला होता.

मात्र सोमवार व मंगळवारी पुन्हा हा रस्ता खोदण्याचे काम सुरूच ठेवण्यात आले होते. काही भाग यंत्राच्या साहाय्याने तर काही भाग कामगार खोदत होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT