Retired engineer's argument continues in power concession scam case Dainik Gomantak
गोवा

साडे नऊ कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य संशयिताच्या पत्नीला अटकपूर्व जामीन मंजूर

तब्बल साडे नऊ कोटींचा गंडा घालणाऱ्या रंगीता एंटरप्राइजेस घोटाळ्यातील मुख्य संशयित जयकुमार गोहिल याची पत्नी आरती कश्यप हिला आज यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला.

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यातील असंख्य गुंतवणूकदारांचे पैसे क्रीप्टो करन्सीत गुंतवण्याचे आमिष दाखवून तब्बल साडे नऊ कोटींचा गंडा घालणाऱ्या रंगीता एंटरप्राइजेस घोटाळ्यातील मुख्य संशयित जयकुमार गोहिल याची पत्नी आरती कश्यप हिला आज दक्षिण गोव्याचे प्रधान सत्र न्यायाधीश इर्शाद आगा यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला.

(Pre-arrest bail granted to the wife of the main suspect in the 9.5 crore scam)

संशयित कश्यप हिला 15 महिन्याचे बाळ असून तिला अटक केल्यास बाळाकडे पाहण्यास कुणी नसेल असे तिचे वकील ऍड. शैलेश ठाणेकर यांनी पटवून दिल्यावर न्या. आगा यांनी हा अर्ज मंजूर केला. संशयिताला अटक केल्यास 25 हजारांच्या जामिनावर मुक्त करावे असे त्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

गुंतवणूकदारांना 30 टक्के व्याजाचा परतावा देण्याचे आमिष दाखविल्याने या कंपनीत लोकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती. सुरवातीला काही दिवस असा परतावा दिल्यावर नंतर मुख्य संशयित जयकुमार गोहिल याने आपले मडगाव येथील दुकान बंद करून गुजरातला पळ काढला होता. नंतर आर्थिक गुन्हेगारी विरोधी विभागातील पोलिसांनी त्याला गुजरात येथे जाऊन अटक केली होती. जयकुमार गोहिल यानेही जामिनासाठी अर्ज केला असून तो 3 ऑगस्ट रोजी सुनावणीस येणार आहे. या प्रकरणी अटक केलेल्या स्वीजल फेर्नांडिस आणि लिंबाजी लमाणी यानी जामिनासाठी केलेल्या अर्जावर उद्या 28 रोजी न्या. आगा यांच्या समोर सुनावणीस येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

Goa Politics: खरी कुजबुज; आमदारांची अशीही ‘गटारी’

Bicholim Murder: घटस्फोट ठरला, पत्नीवर केले तलवारीने वार; डिचोलीतील खूनप्रकरणी आरोपीस 10 दिवस पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT