Pravin Arlekar  Dainik Gomantak
गोवा

Pravin Arlekar : हस्तकलेद्वारे महिलांना बनविणार स्वावलंबी

वारखंड-पेडणे येथे हातमाग केंद्राचे उत्‍साहात उद्‌घाटन

गोमन्तक डिजिटल टीम

राज्‍यात अनेक हस्तकलाकार आहेत. या कलेच्या माध्यमातून प्रत्येक कलाकाराने स्वावलंबी बनले पाहिजे. पेडणे मतदारसंघातील सर्व महिला हस्तकलाकार स्वावलंबी बनण्यासाठी त्‍यांनी हातमागाद्वारे तयार केलेले कपडे वापरात आणण्याकरिता आपले प्रयत्न सुरू आहेत. याच माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवविण्‍याचे काम केले जाईल, असे प्रतिपादन हस्तकला लघुद्योग महामंडळाचे अध्‍यक्ष तथा पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केले.

वारखंड ग्रामपंचायत क्षेत्रात हातमाग केंद्राचे उद्‌घाटन केल्यानंतर प्रमुख पाहुणे या नात्याने आर्लेकर बोलत होते. यावेळी सरपंच गौरी जोसलकर, उपसरपंच वसंत नाईक, पंच मयुरी तुळसकर, रुपेश म्‍हावळणकर, कविता कांबळी, संचालक महादेव गवंडी, माजी उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष पांडुरंग परब, माजी जिल्हा पंचायत सदस्य सूर्यकांत तोरस्कर,

माजी सरपंच रमेश सावळ, देवस्थानचे पदाधिकारी दत्ताराम परब, माजी सरपंच प्रभाकर परब उपस्थित होते.महादेव गवंडी, गौरी जोसलकर यांनीही विचार मांडले. स्वागत, प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन पांडुरंग परब यांनी केले तर वसंत नाईक यांनी आभार मानले.

वारखंड येथील उभारलेल्या हातमाग केंद्राचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घेऊन स्‍वावलंबी बनावे व स्‍वत:च्‍या पायावर उभे रहावे. तसेच हातमागाद्वारे तयार केलेले कपडे जगप्रसिद्ध करण्यासाठी गावागावांतून सुरूवात करावी.

प्रवीण आर्लेकर, पेडणेचे आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

India GDP Growth: भारताची अर्थव्यवस्था सुस्साट! दुसऱ्या तिमाहीत GDP वाढ 8.2 टक्क्यांनी मजबूत, आर्थिक विश्लेषकांचे चुकले अंदाज

सात राजवंशांनी राज्य केलं, पण संस्कृती टिकली! गोव्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी मठांचं कार्य महत्त्वाचं; CM सावंतांचं प्रतिपादन

SCROLL FOR NEXT