Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीला बनवा साबुदाण्याचे चविष्ट पराठे

उपवासाला साबुदाण्याचे खिचडी आणि वडे खायचे नसेल तर यंदा ट्राय करा साबुदाण्याचे चविष्ट पराठे
Ashadhi Ekadashi 2023:
Ashadhi Ekadashi 2023:Dainik Gomantak
Published on
Updated on

Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशीनिमित्त सर्वच उपवास करतात. पण उपवासाला साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे, भगर असे अनेक उपवासाचे पदार्थ बनवले जातात.

तर अनेक लोक साधीसोपी साबुदाणा खिचडी बनवतात.पण यंदा साबुदाणापासून पराठे तयार करून पाहा. हो! यंदा उपवासाला बुदाण्यापासून खमंग पराठे कसे बनवायचे हे जाणून घेणार आहोत.

  • साबुदाण्याचे पराठे बनवण्यासाठी लागणारे साहित्य

भिजवलेला साबुदाणे - 3 वाट्या

उकडलेले बटाटे - 3

हिरव्या मिरच्या - 5 ते 6

शेंगदाण्याचा बारिक कूट - 1 वाटी 

मीठ - चवीनुसार 

तेल  - अंदाजानुसार

लिंबाचा रस - 1 चमचा

Ashadhi Ekadashi 2023:
Monsoon Driving Tips: वेग तर आवराच, पण पावसाळ्यात गाडी चालवताना 'या' गोष्टीही ठेवा लक्षात
  • साबुदाण्याचे थालिपीठ कसे बनवावे

सर्वात पहिले साबुदाणा पाण्यात भिजवून ठेवावे. उरलेलं पाणी काढून टाकून साबुदाणे 3 ते 4 तास चांगले भिजू द्यावे.

शेंगदाणे तव्यावर हलके भाजून हातावर चोळून त्याची सालं काढावीत आणि मिक्सरमध्ये बारिक करावे.

हिरव्या मिरचीची देखील मिक्सरमध्ये पेस्ट करुन घ्यावी.

त्यानंतर बटाटे नीट उकडून घ्यावे आणि नंतर एका डिशमध्ये काढून कुस्करुन घ्यावे.

त्यानंतर त्यात भिजवलेले साबुदाणे, हिरव्या मिरचीची पेस्ट, शेंगदाण्याचे कूट, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस घालावे. 

आता हे सर्व मिश्रण हाताने मळून घ्यावे.

तयार मिश्रणाचे गोळे करुन घ्यावे.

या तयार पिठाचे पराठे तयार करावे. . 

गरम तव्यावर घालून खरपूस भाजून घ्यावे.

तव्यावर आपल्या आवडीनुसार तेल किंवा तूप सोडावे आणि मध्यम आचेवर पराठे दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावे.  

उपवासासाठी तयार केलेले साबुदाण्याचे खुसखुशीत पराठे दह्यासोबत सर्व्ह करावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com