Pravin arlekar, Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

'मोपा'मुळे स्थलांतरित झालेल्या धनगर समाजातील नागरिकांना दिलासा; मुख्यमंत्र्यांकडून भरघोस मदत

Goa News: मोपा विमानतळामुळे स्थलांतरित व्हावे लागलेल्या धनगर समाजातील नागरिकांना मुख्यमंत्र्यांमार्फत आर्थिक साहाय्य व ओटीएस अंतर्गत पाण्याच्या बिलात सवलत देण्यात आली.

Sameer Panditrao

पेडणे: निवडणूकपूर्व आश्वासन पाळताना पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या प्रयत्नाने मोपा विमानतळामुळे स्थलांतरित व्हावे लागलेल्या धनगर समाजातील नागरिकांना मुख्यमंत्र्यांमार्फत आर्थिक साहाय्य व ओटीएस अंतर्गत पाण्याच्या बिलात सवलत देण्यात आली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या उपस्थितीत मोपा विमानतळ पुनर्वसन प्रकल्पांतर्गत येणाऱ्या धनगर समाजातील गंगू लखू वरक, मंदा पाडू वरक, विठू राया वरक, चिमणी ढाकू वरक, सावित्री जानू वरक, चंगू सिधू वरक, सोनू विठू वरक, गीता गंगाराम खरावत, धाकू भागो वरक, सिद्धु बाबू वरक व सोनू राया वरक यांना नागरी विमान वाहतूक संचालनालयातर्फे प्रत्येकी पाच लाख रुपयांचे घर दुरुस्तीसाठी आर्थिक साहाय्य व ओटीएस अंतर्गत पाण्याच्या बिलात सवलत देण्यात आली.

आमदार प्रवीण आर्लेकर यांनी यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अंत्योदय तत्त्वाचे कौतुक करून पेडण्याच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT