Pratima Coutinho Dainik Gomantak
गोवा

बलात्कारी आरोपींना फाशीची शिक्षा द्या: प्रतिमा कुतिन्हो

महिला आणि मुलांना सुरक्षा देण्यात राज्य सरकार अपयशी

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात दिवसेंदिवस बलात्काराच्या घटना वाढत आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना फाशीसारखी कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रतिमा कुतिन्हो यांनी केली आहे. पणजीत पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी भाजप सरकार राज्यातील महिला आणि मुलांना सुरक्षा देण्यात अपयशी ठरल्याचा घणाघाती आरोप केला.

यावेळी कुतिन्हो म्हणाल्या, मागील एका आठवड्यात तीन अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. काही वर्षांपासून राज्यात अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. असे असताना गेल्या दहा वर्षांपासून राज्यात सत्ताधारी असलेले भाजप सरकार मात्र असले क्रूर कृत्य रोखण्यात अपयशी ठरले आहे. यावरून महिलांवरील वाढत्या गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी भाजप सरकारकडे ध्येय धोरण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

लैंगिक शिक्षण अनिवार्य करा

यावेळी प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या, राज्यातील सर्व शाळांमध्ये पाचवीपासून पुढे लैंगिक शिक्षण अनिवार्य केले पाहिजे. कोरोनामुळे शिक्षण ऑनलाईन झाल्याने सर्व मुलांच्या हातात आता मोबाईल आले आहेत. त्यामुळे सध्या लैंगिक शिक्षण अधिकाधिक महत्त्वाचे झाले आहे. जेव्हा मुलांना योग्य लैंगिक शिक्षण मिळते, तेव्हा त्यांच्या मनातील गैरसमज दूर होऊन ती अशा गोष्टींकडे अधिक विचारपूर्वक पाहतील. यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन लैंगिक शिक्षण शाळांमध्ये सुरू करावे.

अत्याचारांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त

राज्यात बलात्काराचे प्रमाण 7.8 टक्के आहे, जे राष्ट्रीय सरासरी 4.3 टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त आहे. गुन्हेगारांच्या मनात कोणतीही भीती नसल्यामुळे आणि राजकीय पाठिंब्यामुळे अशा घटना घडत आहेत. भाजप सरकारने अशा गुन्हेगारांवर कठोर पावले उचलण्याची वेळ आली आहे. याबरोबरच सरकारने पीडित आणि आरोपी दोघांसाठी समुपदेशन सत्र आयोजित केले पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT