प्रतिमा कुतिन्हो  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: "आमदार बाबाशान यांच्या पत्नी फ्रिडासह सर्वांची चौकशी करा"

प्रतिमा कुतिन्हो (Pratima Coutinho) यांनी आप कार्यकर्त्यांसह मायणा कुडतरी पोलिस स्थानकाचे निरीक्षक शिवराम वायगणकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार केली.

दैनिक गोमन्तक

मडगाव: नुवेचे आमदार विल्फ्रेड (बाबाशान) डिसा (MLA Wilfred D'Sa) यांच्या पत्नी फ्रिडा डिसा यांच्यासह आमदाराच्या सर्व समर्थकांची निष्पक्ष चौकशी करा अशी मागणी आपच्या राज्य उपाध्यक्ष प्रतिमा कुतीन्हो (Pratima Coutinho) यांनी केली आहे. (Pratima coutinho has demanded an inquiry into MLA Babashan)

आज त्यांनी आप कार्यकर्त्यासह मायणा कुडतरी पोलिस स्थानकाचे निरीक्षक शिवराम वायगणकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार केली. आमदाराच्या समर्थकांची चौकशी झालीच पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला.

बाबाशान यांच्या समर्थकांनी आप कार्यकर्त्याना शिवीगाळ केली आणि मारहाणही केली. आमदारांची पत्नी फ्रिडा डिसा हिने आप समर्थकावर अंडी फेकून मारली असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

मागच्या शनिवारी आमदार डिसा यांनी केलेल्या पक्षांतराला दोन वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्यांना केक घेऊन गेलेल्या आपच्या कार्यकर्त्यांना आमदार समर्थकांनी नुवे येथे अडविले होते. त्यावेळी आप कार्यकर्ते आणि बाबाशान समर्थक यांच्यामध्ये ही धुमश्चक्री झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ज्ञानेशकुमार आणि मतदारयाद्यांचे 'शुद्धीकरण'

खरी कुजबुज: साडेचार हजार मतांचा फायदा कोणाला?

IND vs AFG Match Cancelled: एकही चेंडू न खेळता टीम इंडियाची एशियन गेम्सच्या सेमीफायनलमध्ये एन्ट्री! मुसळधार पावसामुळे भारत-अफगाणिस्तान सामना रद्द

Manoj Parab: मनोज परब पुन्हा राजकीय आखाड्यात? 2 ऑक्टोबरला भूमिका करणार स्पष्ट; दुसरा गट स्थापन करण्याची तयारी

South Goa Crime Cases: दक्षिणेत 8 महिन्यांत 525 गुन्ह्यांचा छडा, खुनाच्या सर्व सहा प्रकरणांची उकल

SCROLL FOR NEXT