Dr. Rajesh Patil
Dr. Rajesh PatilDainik Gomantak

Goa: जिल्हा इस्पितळाच्या जबादारीतून डॉ. पाटील होणार मुक्त

गोमेकॉचे सर्जरी विभागाचे प्रोफेसर डॉ. राजेश पाटील (Dr. Rajesh Patil) यांना आता 16 जुलै पासून या जबाबदारीतून मुक्त करण्यात येणार आहे.
Published on

मडगाव: मडगावचे दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ (South Goa District Hospital) कोविड इस्पितळ म्हणून घोषित केल्यानंतर या इस्पितळाचे देखरेख अधिकारी म्हणून ताबा घेतलेले गोमेकॉचे सर्जरी विभागाचे प्रोफेसर डॉ. राजेश पाटील (Dr. Rajesh Patil) यांना आता 16 जुलै पासून या जबाबदारीतून मुक्त करण्यात येणार आहे. या संबंधीचा आदेश आज जारी झाला मात्र त्यांच्या जागी अन्य कुणाची नियुक्ती केली आहे ते अजून समजू शकलेले नाही.

हे इस्पितळ कोविड इस्पितळ म्हणून घोषित करून त्याचा ताबा गोमेकॉकडे दिल्यानंतर 9 सप्टेंबर 2020 रोजी डॉ . पाटील यांनी नोडल अधिकारी म्हणून या इस्पितळाचा ताबा घेतला होता. त्यानंतर त्यांनी या इस्पितळाची घडी व्यवस्थित बसविली होती. सुरवातीला त्यांच्या बरोबर डॉ. सुनंदा आमोणकर यांची नियुक्ती केली होती. नंतर त्यांना परत गोमेकॉत नेण्यात आले होते.

Dr. Rajesh Patil
Goa : मडगाव शहरात पायाभूत सुविधा निर्माण करण्यास माझे प्राधान्य - दिगंबर कामत

डॉ. पाटील यांच्या देखरेखीखाली या जिल्हा इस्पितळात 5 हजारपेक्षा जास्त रुग्णांवर मागच्या 10 महिन्यात उपचार केले गेले असून गोव्यात ज्यावेळी कोविड लाटेने उच्चाक गाठला होता त्यावेळीही डॉ. पाटील यांनी सक्षमतेने या इस्पितळाचा कारभार सांभाळला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com